शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा येथील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनियमिता

By admin | Updated: December 14, 2015 02:19 IST

तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील एकूण ४२ गावांसाठी पोलीस पाटील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

दोषींवर कारवाई करा : ना आवेदन तपासले, ना गुण जाहीर केलेगोंदिया : तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील एकूण ४२ गावांसाठी पोलीस पाटील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या पोलीस पाटील पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून भ्रष्टाचाराचे गालबोट लागल्याची चर्चा होत आहे.तिरोडा तालुक्यातील २८ गावे व गोरेगाव तालुक्यातील १४ गावांचे पोलीस पाटील पदाचे अर्ज उपविभागीय अधिकारी तिरोडा येथे जमा झाले. मात्र ३२४ अर्जांची छाननीसुद्धा करण्यात आली नाही व सरळ त्यांना परीक्षेसाठी बोलाविण्यात आले. तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयात ६ नोव्हेंबर २०१५ ला ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी २ तासांचा वेळ असून ११ ते १ वाजेपर्यंत परीक्षा सुरळीत पार पडली.लगेच त्या दिवशी २ तासानंतर परीक्षेचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. पण उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी सांगितले की, ९ नोव्हेंबर २०१५ रोजी बुधवारी निकाल जाहीर करण्यात येईल. परंतु त्यांनी ९ नोव्हेंबर २०१५ ला निकाल जाहीर न करता १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता निकाल जाहीर केला. पण त्या निकालामध्ये रोल नंबर आहे. त्यामध्ये पात्र उमेदवारांचे रोल नंबर (बैठक क्रमांक) देण्यात आले आहेत. तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील ४२ गावांतील पोलीस पाटील पदासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या निकालात केवळ बैठक क्रमांक बैठक क्रमांक देण्यात आले आहेत, गुण दर्शविलेले नाहीत. यामध्ये १६५ उमेदवारांचे बैठक क्रमांक असून किती गुण कुणाला मिळाले, हे त्यात दिलेले नाही. यावर किती गुणावर उमेदवार पास झाला, असे विचारल्यावर त्यांनी ३६ गुण मिळाले त्यांचे क्रमांक आहे. नंतर त्यांनी नावांची यादी लावली.सदर प्रकाराबाबत वरिष्ठ कारकून टेंभुर्णे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तोंडी परीक्षा ही २० गुणांची आहे. तोंडी व ८० गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण अशा एकूण गुणांची यादी शेवटी लावण्यात येईल, असे सांगितले. उपविभागीय अधिकारी यांनी ४ ते ५ दिवस निकाल लावण्यासाठी उशीर केला आणि किती गुण कुणाला मिळाले, याची यादी लावली नाही. आवेदन स्वीकारल्यानंतर जाहीरनाम्याप्रमाणे आवेदन तपासणीकरिता लेखी परीक्षेसाठी पात्र केले. ३२४ उमेदवारांमध्ये अनेक उमेदवारांचे २५ वर्षे वय पूर्ण नसूनसुद्धा त्यांनी परीक्षा दिली. ४५ वर्षे वयाची अट असून ४५ पूर्ण झालेल्या व ४६ वर्षे सुरू असलेल्या उमेदवारांनीसुद्धा परीक्षेला बसले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलीस पाटील पदभर्ती प्रक्रियेमध्ये हुशार उमेदवारांचा पात्र यादीमध्ये रोल नंबर (बैठक क्रमांक) नसून कमी शिकलेल्या उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये गैरप्रकार झाला, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. सदर पोलीस पाटील भर्ती प्रक्रिया रद्द करुन पुन्हा निष्पक्ष करण्यात यावी व दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गोरेगाव व तिरोडा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)