अनियमित बसगाड्यांमुळे विद्यार्थिनींसह प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:00 AM2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:18+5:30

भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोलीवरुन केशोरी करीता सुटणाºया सर्वच बसफेºया कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या बसमध्ये प्रवासी सुद्धा असतात. त्यांना देखील निर्धारित वेळेत कधीच पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत.

Irregular buses hit commuters with students | अनियमित बसगाड्यांमुळे विद्यार्थिनींसह प्रवाशांना फटका

अनियमित बसगाड्यांमुळे विद्यार्थिनींसह प्रवाशांना फटका

Next
ठळक मुद्देआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष : शैक्षणिक नुकसान, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : साकोली आगारातील बसगाड्या साकोली-केशोरी, साकोली-राजोली, साकोली-दिनकरनगर या दैनंदिन बसफेऱ्या सुरु असून या गाड्या कधीच वेळेत पोहोचत नाही. दररोज या गाड्यांच्या नियमित वेळापत्रकात बदलामुळे शालेय विद्यार्थिनीसह प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसत आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे.यामुळे बस ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियमित बससेवा सुरू ठेवली नाही तर सावित्रींच्या लेकींना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोलीवरुन केशोरी करीता सुटणाºया सर्वच बसफेºया कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या बसमध्ये प्रवासी सुद्धा असतात. त्यांना देखील निर्धारित वेळेत कधीच पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत. साकोलीवरुन ५.३० वाजताच्या दरम्यान सुटणारी साकोली-केशोरी रात्रफेरी बस नवेगाववरुन रेल्वे प्रवाशांना पिकप करुन पुढच्या प्रवासासाठी निघणे असा साकोली आगार प्रमुखांचा आदेश असताना सुद्धा ही बस फेरीचे चालक-वाहक रेल्वेच्या प्रवाशांची वाट न पाहता नवेगाववरुन बस सोडून पुढच्या प्रवासाला निघून जातात. परिणामी प्रवाशांना त्रास भोगून केशोरीपर्यंत यावे लागते. मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.ही बस फेरीसुद्धा निश्चित केलेल्या वेळेत कधीच येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत अहे. या बसच्या अनियमितपणामुळे या परिसरात परिवहन मंडळाविषयी असंतोष व्याप्त आहे. अनेकदा शाळा प्रमुखांनी यासंबंधी आगार प्रमुखाकडे तक्रार केली पण त्यांनी सुध्दा त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थिनी आणि प्रवाशांची समस्या कायम आहे. साकोलीवरुन केशोरीकरिता सुटणारी रात्रपाळीतील बस नवेगावबांध येथे रेल्वे प्रवाशी आल्याशिवाय सोडू नये,त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरापासून साकोली-केशोरी, साकोली-राजोली, साकोली कुरखेडा,साकोली दिनकरनगर या बसफेऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वेळेवर सोडण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी संघटना प्रमुख पिंटू मशिद यांनी दिला आहे.

Web Title: Irregular buses hit commuters with students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.