सोन्यातील घसरणीने गुंतवणूकदार धास्तावले

By Admin | Updated: September 16, 2014 23:49 IST2014-09-16T23:49:48+5:302014-09-16T23:49:48+5:30

दोन वर्षापूर्वीपर्यंत सतत वाढतीवर असणाऱ्या आणि क्वचितच थोडे दर उतरून काही दिवसातच पुन्हा उसंडी घेणाऱ्या सोन्याची झळाळी गेल्या दोन वर्षात मात्र चांगलीच कमी झाली आहे.

Investors fear deteriorating in gold | सोन्यातील घसरणीने गुंतवणूकदार धास्तावले

सोन्यातील घसरणीने गुंतवणूकदार धास्तावले

गोंदिया : दोन वर्षापूर्वीपर्यंत सतत वाढतीवर असणाऱ्या आणि क्वचितच थोडे दर उतरून काही दिवसातच पुन्हा उसंडी घेणाऱ्या सोन्याची झळाळी गेल्या दोन वर्षात मात्र चांगलीच कमी झाली आहे. अलिकडच्या काही दिवसात दर चढण्याऐवजी ते कमी होत असल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारे लोक धास्तावले आहेत. त्यामुळे सध्या गोंदियाच्या सुवर्ण बाजारातही खरेदीला उठाव नसल्याचे दिसून येते.
दोन वर्षापूर्वी ३१ हजारांवर गेलेला सोन्याचा दर आता २७ हजार ४०० वर घसरला आहे. गेल्या पाच मिहन्यांत अडीच हजारांनी सोन्याचे दर घसरले. दररोज सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक चढतीवर असल्याने दिवाळीपर्यंत सोने आणखी खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुरिक्षत गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचार नेहमीच केला जातो. गेल्या १५ वर्षातील सोन्याच्या दरावर एक नजर टाकली असता हे दर कितीतरी पटींनी वाढले आहेत. सततत चढतीवर असणाऱ्या सोन्याच्या दरामुळे अनेकांनी सोन्यात गुंतवणूक केली. परंतू दोन वर्षांपासून सोन्याचे दर सतत अस्थिर आहेत. ३१ ते ३१ हजार ५०० रुपये प्रति तोळा गेलेले सोन्याचे दर आता २७ हजाराच्या घरात पोहोचल्याने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी आता हात आखडता घेतला आहे. सोन्यातील ही घसरण जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत समजले जातात. त्यामुळे सोने ही एक सुरिक्षत ठेव समजून त्यात गुंतवणूक करताना आता सर्वांनाच विचार करावा लागणार आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या टप्प्यात असल्याने भाव आणखी कमी होऊ शकतात, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Investors fear deteriorating in gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.