आंतरराज्य बदली ईटीपीची कोरणी नाक्यावरून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:14+5:302021-01-24T04:13:14+5:30
विभागातील विविध वन उपज, मालकी खसरा प्रकरणातील लाकडे, आंतरराज्य बदली पास, शासकीय वन आगारातील लाकडे निकासी करण्याकरिता वाहतूक परवाना ...

आंतरराज्य बदली ईटीपीची कोरणी नाक्यावरून सुरुवात
विभागातील विविध वन उपज, मालकी खसरा प्रकरणातील लाकडे, आंतरराज्य बदली पास, शासकीय वन आगारातील लाकडे निकासी करण्याकरिता वाहतूक परवाना जारी करण्यात येत होता. ही कार्य पद्धत ब्रिटिश काळापासून सुरू आहे. काळानुरूप वाहतूक परवान्यामध्ये बदल होणे आवश्यक होते. महाराष्ट्र-बालाघाट सीमेवर कोरणी तपासणी नाका येथून २२ जानेवारीपासून कोरनी येथून गोंदिया ते अनंतपूर, आंध्र प्रदेश पहिले संगणकप्रणित आंतरराज्य बदली वन वाहतूक पास भोया नरसिम्हा यांना गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. नांदवटे यांनी दिले आहे. आधुनिक युगात विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग करून, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासन अधिक सुकर, गतिशील आणि लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे. महाराष्ट्र वनविभाग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नेहमी आघाडी आहे. त्यात वनविभागाने लोकसेवा हमी कायद्यामधील सुविधा नागरिकांना दिल्या आहेत. आणखी एक पाऊल पुढे जात ईटीपी (मालकी) आंतरराज्य बदली पासही संगणक चलित झाला आहे. गोंदिया वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पहिली ईटीपी (संगणकप्रणित वाहतूक परवाना) कास्तकारांना जारी केले आहे.