आंतरराज्यीय घरफोड्याला अटक

By Admin | Updated: May 31, 2014 23:35 IST2014-05-31T23:35:09+5:302014-05-31T23:35:09+5:30

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या परिसरात चोरी करणार्‍या एका आंतरराज्यीय टोळीतील सदस्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन जण फरार आहेत.

Intermediate house arrest | आंतरराज्यीय घरफोड्याला अटक

आंतरराज्यीय घरफोड्याला अटक

गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या परिसरात चोरी करणार्‍या एका आंतरराज्यीय टोळीतील सदस्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन जण फरार आहेत.
गोंदिया जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण नावडकर व त्यांचे सहकारी जिल्ह्यात घरफोडीच्या जुन्या आरोपींना तपासण्यासाठी गस्त घालत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनीे आरोपी समीर ऊर्फ पालो उर्फ राकेशसिंग ऊर्फ छोटू बंगाली वल्द जमाल शेख (२९) रा.मासुरकर चौक, गंगाजमूना इतवारी नागपूर हा नेहरू चौक गोंदिया येथे संशयास्पद स्थितीत फिरताना मिळाला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने २४ एप्रिल २0१४ रोजी आपला सहकारी सायफुन शेख (२८) रा.हापुर, गलघडा, (पश्‍चिम बंगाल) याच्याबरोबर हड्डीटोली रोड, रामनगर गोंदिया येथे चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरीतील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम सायफुन शेख याने घेतल्याचे सांगितले. सदर घटनेपासून त्याच्याकडील फोन बंद ठेवून पळून गेल्याचे सांगितले. सदर मालाबाबत ताब्यात घेतलेल्या आरोपीने चोरीतील काही चांदीचे दागिणे हे मासूद अफजल खान (३५) रा. संजय नगर वॉर्ड, रा. रायपूर (छ.ग.) याला दिल्याचे सांगितले. मकसूद हा सदर चांदीचे दागिने घेवून पळाल्याचे सांगितले. सदर आरोपी हे जिल्हा रायपूर, जिल्हा राजनांदगाव, भिलाई (छ.ग.) नागपूर शहर येथील घरफोडीचे सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील २ आरोपी हे परराज्यात फरार झाले आहेत.
सदर कारवाई भांडारकर, नावडकर यांच्यासह स.फौजदार नवखरे, पोलीस हवालदार शंकर साठवणे, अर्जुन कावळे, रामलाल सार्वे, अण्णा ब्राम्हणकर, संतोष काळे, अजय सव्वालाखे, धनंजय शेंडे, भुवनलाल देशमुख, तुलसीदास लुटे, रेखलाल गौतम, राजकुमार खोटेले, नितीन जाधव, दीक्षित दमाहे, विनय शेंडे, अशोक कापसे, सयाम यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Intermediate house arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.