रब्बी धान पिकांवर किडरोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:00:13+5:30

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाले. त्यामुळे धानाची चांगली वाढ झाली आहे. आता धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचे आक्रमण झाले आहे.

Insect infestation on rabi rice crops | रब्बी धान पिकांवर किडरोगांचे आक्रमण

रब्बी धान पिकांवर किडरोगांचे आक्रमण

ठळक मुद्देहाती आलेले पीक गमाविण्याची वेळ : चार हजार हेक्टरमधील पिके बाधीत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ढगाळ व उष्ण दमट वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील धान पिकांवर होत आहे. वातावरणातील बदलामुळे ४ हजार हेक्टरमधील धान पिकांवर करपा, मानमोडी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हाती आलेले धानपिके गमाविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर आहे.
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाले. त्यामुळे धानाची चांगली वाढ झाली आहे. आता धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचे आक्रमण झाले आहे.
परिणामी धानावर खोडकिडा, पेरवा, मानमोडी, पर्णकोस, करपा, लोंबीवरील ढेकण्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धानाचे लोंब पांढरे पडत असून शेतकºयांना हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाच्या मते बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक धान पिकावर परिणाम होत आहे. ढगाळ आणि उष्णदमट वातावरण बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी अनुकुल असते. त्यामुळे सध्या बुरशीेजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धानाचे लोंब पांढरे पडत आहे. ४० हजार हेक्टरपैकी जवळपास ४ हजार हेक्टरमध्ये या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या धान निसविण्याच्या स्थितीत आहे याच कालावधी करपा, मानमोडी, पेरवा, खोडकिडा या किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकºयांना हाती आलेले पीक गमवावे तर लागणार नाही ना अशी चिंता सतावित आहेत. धानावरील किडरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र यानंतरही किडरोग आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.

सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव परिसराला फटका
रब्बी हंगामातील धानाची सर्वाधिक लागवड ही अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात आली आहे. मात्र या भागातील धान उत्पादक शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून चिंतातूर आहे. ऐन धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना हाती आलेली पीक गमाविण्याची वेळ आली आहे. किटकनाशकांची फवारणी करुन सुध्दा किडरोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी सुध्दा यामुळे त्रस्त झाले आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव पाहता शेतकºयांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.

या धानावर कमी प्रादुर्भाव
इतर धानाच्या प्रजातींच्या तुलनेत सुमो,बाहुबली, १००१ या धानाच्या प्रजातीवर किडरोगांचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील वर्षी शेतकºयांनी अहिल्या प्रजातीच्या धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. त्यापासून चांगले उत्पादन मिळाल्याने शेतकºयांनी यंदा देखील मोठ्या प्रमाणावर याच धानाची लावगड केली.मात्र सध्या या धानावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.त्यामुळे शेतकºयांनी धानपिकावरील रोगाला सुध्दा सध्या कोरोना हे नाव दिल्याची माहिती आहे.

ढगाळ आणि उष्ण दमट वातावरणामुळे धानपिकावर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार हेक्टरमधील पिके किडरोगामुळे बाधीत झाली आहे. किडरोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने त्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्याचे अधिकार तालुका स्तरावर तहसीलदार आणि कृषी अधिकाºयांना सुध्दा आहे. तसेच शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Insect infestation on rabi rice crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती