जिल्ह्यात मोहरी उत्पादनाचा नावीन्यपूर्ण प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST2020-12-19T05:00:00+5:302020-12-19T05:00:27+5:30
गोंदिया जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जात असून दूरवर जिल्ह्याची ख्याती आहे. त्यामुळे येथील शेतकरी धानाचे पीकच प्रामुख्याने घेत असून त्यापलीकडे ते विचार करीत नसल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यातील शेती आजही बहुतांश बरथेंबी पावसावर अवलंबून आहे. अशात चांगला पाऊस तर शेतकरी उन्हाळी धान पीकही घेतो. मात्र कमी पाऊस झाल्यास तो हंगामही हातून जातो. शिवाय किडरोग व अन्य नैसर्गिक कारणांमुळे धानाचे उत्पादन कधी चांगले तर कधी कमी होते.

जिल्ह्यात मोहरी उत्पादनाचा नावीन्यपूर्ण प्रयोग
n n n n कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याची धानाचा जिल्हा म्हणून ख्याती असून धान हेच येथील शेतकऱ्यांचे प्रमउख पीक आहे. मात्र कधी पाऊस तर कधी किडरोग यामुळे येथील शेतकरी नेहमीच धान पिकाला घेऊन संकटात दिसून येतो. शिवाय भरपूर पाऊस तर ठीक मात्र पाऊस कमी झाल्यास उन्हाळी (रब्बी) धान पीक त्याला घेता येत नाही. अशात शेतकऱ्यांना धानाला जोड म्हणून कृषी विभागाने यंदा मोहरी लागवडचा प्रयोग जिल्ह्यात केला आहे. यासाठी २०० एकरात प्रथमच मोहरी लागवड करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जात असून दूरवर जिल्ह्याची ख्याती आहे. त्यामुळे येथील शेतकरी धानाचे पीकच प्रामुख्याने घेत असून त्यापलीकडे ते विचार करीत नसल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यातील शेती आजही बहुतांश बरथेंबी पावसावर अवलंबून आहे. अशात चांगला पाऊस तर शेतकरी उन्हाळी धान पीकही घेतो. मात्र कमी पाऊस झाल्यास तो हंगामही हातून जातो. शिवाय किडरोग व अन्य नैसर्गिक कारणांमुळे धानाचे उत्पादन कधी चांगले तर कधी कमी होते. परिणामी येथील शेतकरी नेहमीच चिंतेत दिसून येतो. विशेष म्हणजे, यंदा पुर, अवकाळी व किडरोगांची धानाची नासाडी केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अशात शेतकऱ्यांना धानाच्या जोडीला अन्य पीक देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारता यावी यासाठी कृषी विभागाकडून नेहमीच नवनवे प्रयोग केले जातात. यातच यंदा कृषी विभागाने जिल्ह्यात प्रथमच मोहरी उत्पादनाचा प्रयोग केला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकरी रब्बी पीकांकड वळला असून १९ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात हरभरा, लाखोळी, जवस, ज्वारी, गहू व अन्य पिकांचा समावेश असतानाच २०० एकरात मोहरीची लागवड करण्यात आली आहे. मोहरी हे तेलबीय पीक असून अत्यंत फायदेशीर असे पीक आहे. यामुळे जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकरी यातून आपली चांगलीच प्रगती साधू शकरणार यांत शंका नाही.
जिल्ह्यात करडई लागवडीचे दुसरे वर्ष
जिल्ह्यात यंदा मोहरीचा प्रयोग पहिल्यांदाच केला जात आहे. मात्र करडईचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षापासून जिल्ह्यात कृषी विभागाकडून करडईची लागवड केली जात आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ३०० एकरात करडईची लागवड करण्यात आली. होती. तर यंदा २०० एकरात करडई लावण्यात आली आहे.
१९००० हेक्टरमध्ये रब्बीची लागवड
यंदा जिल्ह्यात १९००० हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये ५११२ हे. क्षेत्रात हरभरा, ६५४३ हे. क्षेत्रात लाखोळी, २०२२ हे.क्षेत्रात जवस, १२२९ हे.क्षेत्रात गहू व अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. सोतबच आता मोहरीची लागवड करण्यात आली असल्याने यंदाचा प्रयोग बघून पुढील वर्षी त्यात वाढ करता येवू शकते.