ग्रामसभेविषयी अनास्था ठरतेय गावच्या विकासात बाधा
By Admin | Updated: May 15, 2014 01:26 IST2014-05-15T01:26:47+5:302014-05-15T01:26:47+5:30
सध्याच्या काळात ग्रामसभेबद्दल ग्रावकर्यांना विशेष रूची नसल्याचे सर्वत्र दिसून येते. ग्रामसभेची उद्दिष्ट्ये स्वरूप, याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती नसल्याने ग्रामसभेला प्रतिसाद मिळत नसून..

ग्रामसभेविषयी अनास्था ठरतेय गावच्या विकासात बाधा
आमगाव : सध्याच्या काळात ग्रामसभेबद्दल ग्रावकर्यांना विशेष रूची नसल्याचे सर्वत्र दिसून येते. ग्रामसभेची उद्दिष्ट्ये स्वरूप, याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती नसल्याने ग्रामसभेला प्रतिसाद मिळत नसून अनेक ठिकाणी ग्रामसभेबद्दल ग्रामपंचायत सदस्यांसह गावकर्यांना विशेष रूची नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
अनेक गावांमध्ये ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती केवळ नावापुरतीच असते. ग्रामपंचायतचा शिपाईघरोघरी जाऊन अथवा पायरीवर बसून ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या घेत असल्याचे चित्र अनेक गावात पाहवयास मिळते. त्यामुळे ग्रामसभेत मांडलेले कित्येक संकल्प हवेतच विरून जातात. प्रत्येकवेळी नवीन संकल्प करण्याची वेळ ग्रामसभेवर येत आहे. गावाच्या एकूण लोकसंख्येच्या एकदशांश लोकही ग्रामसभेत उपस्थित राहत नसल्याने सभेचे ठराव केवळ कागदोपत्रीच दिसत येत आहे. ते प्रत्यक्षात आणताना अनेक अडचणी येत असतात.
६३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरीब महिला व अन्य वंचित समाजघटकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता यावे, या दृष्टीने ग्रामसभेची रचना करण्यात आली.
ग्रामस्थांच्या सहभागामुळे सक्रीय लोकशाहीचा अनुभव यावा, कारभारात पारदर्शकता येऊन जबाबदारीने सामूहिक यश दिसून यावे, हा ग्रामसभेचा मूळ हेतू आहे. दुरूस्तीत केलेल्या सूचनेनुसार तीन महिन्यातून एकदा तरी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे.
विशेषत: प्रजासत्ताक दिन, कामगार दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, अशा वेळी गावाच्या गरजा पाहून ग्रामपंचायतने कोणती विकास कामे हाती घ्यावीत. हे ग्रामसभेकडून निश्चीत होणे अपेक्षित असते.
वार्षिक योजना मंजूर करणे, महिला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभाग घेणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात सुधारणा व काटकसर सुचविण्यासाठी पुढाकार घेणे, कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे, दारिद्रय़रेषेखालील यादीवर चर्चाकरणे, गावाच्या हद्दीतील सर्वनैसर्गिक साधनसंपत्तीवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलणे, असे ग्रामसभेचे स्वरूप व कार्य आहे.
पंचायत तरतुदी कायदा १९१९ नुसार जंगलापासून मिळणार्या किरकोळ उत्पादनाची मालकी, विकास कामांना मंजुरी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड, जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भात विचारविनिमय, लघु जलसिंचन योजनेचे व्यवस्थापन नशा आणण्यार्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणणे, दारूबंदीवर चर्चा, अवैध धंद्यावर बंदी घालणे, गावाच्या बाजाराचे व्यवस्थापन, सर्वसामाजिक क्षेत्रातील संस्था व संस्थाचालकांवर नियंत्रण अनेक अधिकार, ग्रामपंचायला आहे.
त्याची माहिती नसल्याने बरेच गावकरी ग्रामसभेबाबत अनभिज्ञ आहेत.(शहर प्रतिनिधी)