चांदोरी खु.परिसरात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:23+5:302021-04-10T04:28:23+5:30

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील इंदोरा बु. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या चांदोरी खु.उपकेंद्रातंर्गत एका वृद्ध इसमासह त्यावी नात असे ...

Infiltration of corona in Chandori area | चांदोरी खु.परिसरात कोरोनाचा शिरकाव

चांदोरी खु.परिसरात कोरोनाचा शिरकाव

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील इंदोरा बु. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या चांदोरी खु.उपकेंद्रातंर्गत एका वृद्ध इसमासह त्यावी नात असे चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अचानकच गावातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सध्या या परिसरात नागरिक धास्तावले आहेत, पण आरोग्य विभागाने फक्त एकाच रुग्णाला सरांडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले असून अन्य तिघांना घरी ठेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले हात मोकळे केले आहे. त्यातही त्यांना कोणत्याही प्रकारचे औषध देण्यात आले नाही. याबाबत वैद्यकीय अधिकारी व तहसीलदारांशी संपर्क करण्याता प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. आरोग्यसेविका परिहार यांच्याशी सपंर्क केला असता रुग्णांचे आईवडील बालकांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यास तयार नसल्याचे सांगितले. या रुग्णांमुळे परिसरातील नागरिक धास्तावले असून आरोग्य विभागाने दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Infiltration of corona in Chandori area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.