अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक फेकले नालीत

By Admin | Updated: August 2, 2015 01:56 IST2015-08-02T01:56:26+5:302015-08-02T01:56:26+5:30

शहराच्या लक्ष्मीनगरातील मनोहरभाई वॉर्डात बस स्थानकाच्या मागील भागात एक अर्भकाला नालीत टाकण्यात आले.

Infants born out of immorality | अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक फेकले नालीत

अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक फेकले नालीत

गोंदिया : शहराच्या लक्ष्मीनगरातील मनोहरभाई वॉर्डात बस स्थानकाच्या मागील भागात एक अर्भकाला नालीत टाकण्यात आले. ही घटना शुक्रवारच्या सकाळी उघडकीस आली. अनैतिक संबंधातून हे मुल जन्माला आले असावे असा कयास लावला जात आहे.
७ ते ८ महिन्याचे ते अर्भक असुन पुरूष जातीचे ते अर्भक होते. सदर घटने संदर्भात नंदकिशोर गणपतराव पागोडे (४५) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या परिसरात कोणती तरूणी गर्भवती होती याची गुप्त चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. नालीत फेकण्यात आलेले पुरूष जातीचे अर्भक हे अनैतिक संबंधातूनच जन्माला आले असावे असा दाट संशय पोलीसांना येत आहे. मुलगी असती तर एखाद्या व्यक्तीने मुलाच्या हव्यासापायी तर गर्भपात केला नाही अश्या संशयाला चालना मिळाली असती. परंतु हे अर्भक पुरूष जातीचे असल्यामुळे अनैतिक संबंधातूनच हा प्रकार घडला असावा असा संशय आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Infants born out of immorality