शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

इंदिरा गांधींचे जीवनच एक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 9:54 PM

लहानपासूनच नेतृत्व गुणांना आत्मसात करून स्वातंत्र्याच्या युद्धात इंदिरा गांधींनी भाग घेतला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : इंदिरा गांधी जन्मशताब्दी उत्सवाची सांगता, गांधी प्रतिमा चौकात सभा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : लहानपासूनच नेतृत्व गुणांना आत्मसात करून स्वातंत्र्याच्या युद्धात इंदिरा गांधींनी भाग घेतला. पाकिस्तानातून बांगला देश वेगळा करून स्वतंत्र देशाचा दर्जाचा मिळवून दिला. हुकूमशहासारखे शासन न करता त्यांनी लोकशाहीचा पाय भक्कम केला. आयर्न लेडीची ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांनी देशासाठी जीवन अर्पण केले असून त्यांचे जीवनच एक संदेश असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.इंदिरा गांधी जन्मशताद्बी उत्सव समितीच्यावतीने जिल्ह्याच्या भ्रमणावर निघालेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती यात्रेच्या समारोप समारंभानिमित्त रविवारी येथील गांधी प्रतिमा चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यात्रेचे युवक कॉंग्रेस, एनएसयुआय व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी युवा नेता विशाल अग्रवाल, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप ठाकूर, एनएसयुआय अध्यक्ष संदीप रहांगडाले, शहर युवक अध्यक्ष नफीस सिद्धीकी यांच्या नेतृत्वात अदासी-तांडा येथे स्वागत करून मोटारसायकल रॅली काढून जयस्तंभ चौकात आणले. त्यानंतर आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात रॅली काढून शहराचे भ्रमण करीत रॅली सभा स्थळी पोहोचली.सभेत कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारताच्या विकासाची नवी कथा लिहिण्यात आली. पंडीत नेहरूंनी बनविलेल्या धोरणांना पुढे लागू करून त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला गती दिली.त्यांनी घेतलेल्या पराक्रमी पवित्र्यामुळेच अमेरिकेसारखा शक्तीशाली देश त्यांना घाबरत असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी, इंदिरा गांधी यांची आजही देश आठवण करीत असून त्यांचा सारखा पंतप्रधान देशाला अद्यापही मिळाला नसल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविक जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे यांनी केले. संचालन शहर महासचिव व उत्सव समिती संयोजक अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार जिल्हा महासचिव अमर वराडे यांनी मानले.कार्यक्रमाला माजी आमदार रामरतन राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, प्रदेश सचिव विनोद जैन, डॉ. योगेंद्र भगत, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, राधेलाल पटले, डॉ.नामदेव किरसान, महिला अध्यक्ष उषा सहारे, अनिल गौतम, महासचिव अशोक लंजे, सहेसराम कोरोटे, शेषराव गिरेपुंजे, राजेश नंदागवळी, पृथ्वीपालसिंह गुलाटी, राकेश ठाकूर, शकील मंसूरी, भागवत नाकाडे, डेमेंद्र रहांगडाले, विशाल शेंडे, रत्नदीप दहिवले यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारइंदिरा गांधी जन्मशताब्दी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, भाषण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी आमदार अग्रवाल व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.