इंदिरा आवास योजनेचे २.४१ कोटी अडकले
By Admin | Updated: May 7, 2016 01:48 IST2016-05-07T01:48:46+5:302016-05-07T01:48:46+5:30
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने लाभार्थ्यांवर आत्महत्येची पाळी$$्पिरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीतील

इंदिरा आवास योजनेचे २.४१ कोटी अडकले
एसटी प्रवर्ग : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने लाभार्थ्यांवर आत्महत्येची पाळी$$्पिरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीतील हद्दीतील एस.टी. प्रवर्गासाठी सन २०१४-१५ मध्ये ५४१ घरकूल मंजूर झाले होते. त्यासाठी २ कोटी ४१ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. तो वाटपही झाला व लाभार्थ्यांनी कामही केले. घरकुलाचे काम पूर्ण झाले. ५० टक्के रकमेवर दुकानदाराकडून साहित्य उधारी उसनवारी आणून पूर्ण केले. आज ना उद्या निधी मिळणारच, असे लाभार्थ्यांना वाटत होते. पण वर्षभराचा काळ लोटला, मार्च संपला पण एक रूपयासुद्धा आला नसल्याने लाभार्थ्यांची मोठीच पंचाईत झाली आहे.
दुकानदार, मंज़ूर वर्ग, घरकूल लाभार्थ्यांच्या घराच्या चकरा मारत आहेत. लाभार्थी पंचायत समितीत जाऊन आपली चपल झिझवत आहेत. पण शासनाकडून निधीच प्राप्त नाही तर पैसे अधिकारी कुठून देणार. एससी प्रवर्गासाठी २५१ घरकूल व इतर १२३ मंजूर झाले होते. यांचा संपूर्ण निधी प्राप्त झाला, वाटपही झाले. पण एस. टी. प्रवर्गाचा निधी न मिळाल्याने लाभार्थी हतबल झाले आहेत. शासनाने या लाभार्थ्यांना व्याजासह निधी द्यावा, अशी मागणी गरीब दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असलेल्या एस.टी. प्रवर्गातील लाभार्थ्यांनी केली आहे.
खंडविकास अधीकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कव्हरेजच्या बाहेर असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. पण संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता निधी प्राप्त झाला नसून निधी येताच लाभार्थ्यांना देऊ. यासाठी वरिष्ठांनी मंत्रालयाशी संपर्क करणे गरजेचे आहे. काही पं.स. पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता यात आम्ही काय करणार. पैशाची मागणी जि.प. ने केली असल्याचे सांगितले. सन २०१५-१६ चे घरकूल योजनेचे पैसे सरळ आर.टी.जी.एस. अंतर्गत मिळत असल्याने निधी सरळ त्यांच्या खात्यात मंत्रालयातून जमा होते. फक्त बिल टाकून कामे होत आहेत. लाभार्थ्यांना पण त्रास होत नाही.
सन २०१४-१५ च्या निधीसाठी लोकप्रतीनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ही बाब संपूर्ण जिल्ह्यात आहे. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)