वाढीव वीज बिलांची जाळली होळी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:17+5:302021-02-06T04:54:17+5:30
देवरी : वीज बिल माफ करावे व ग्रामीण भागातील विजेची समस्या त्वरित सोडविण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ...

वाढीव वीज बिलांची जाळली होळी ()
देवरी : वीज बिल माफ करावे व ग्रामीण भागातील विजेची समस्या त्वरित सोडविण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) येथील वीज वितरण कार्यालयावर जनाक्रोश आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वीजबिलाची होळी जाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग न घेता वीज वितरण कंपनीने शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहकांना एप्रिल ते जून या ३ महिन्यांचे सरासरी युनिटच्या आधारे अव्वाच्या सव्वा रकमेचे वीज बिल पाठविले आहे. सुमारे ३ महिने सर्व व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने व्यापारी ग्राहकांकडे भरमसाट वीज बिलाची मागणी केली आहे. तसेच ज्यांनी वीज बिल भरले नाही त्यांना नोटीस पाठवून कनेक्शन कापण्याचे कार्य वीज वितरण कंपनी करीत आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून, वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ५) भाजप पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार संजय पुराम व तालुकाध्यक्ष अनिल येरणे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर जनाक्रोश आंदोलन व निदर्शने करून वीज बिलाची होळी केली.
याप्रसंगी वीज बिल माफ करावे व ग्रामीण भागातील विजेची समस्या त्वरित सोडविण्यात यावी, या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता फुलझेले यांना देण्यात आले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, दीपक शर्मा, संतोष तिवारी, राजेश चांदेवार, आफताब शेख, लल्लन तिवारी, विलास शिंदे, इंद्ररजीतसिंग भाटिया, कौशल्या कुंभरे, सविता पुराम, देवकी मरई, गोमती तितराम, सरिता रहांगडाले, रचना उजवणे, माजीद खान, पारस कटकवार, विनोद भांडारकर, कमल येरणे, इमरान खान, किशोर ऐनप्रेडीवार, नितेश वालोदे, दिनेश भेलावे, देवानंद मेश्रा, डॉ. रहांगडाले, योगेश ब्राह्मणकर यांच्यासह मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.