शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा व देवरी तालुक्यात कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र यानंतर कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात स्थानिक रुग्णांचे फार कमी होते. मात्र आता स्थानिक रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देदोन कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : ७७७४ नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२६) तिरोडा तालुक्यात दोन तर देवरी येथे एक कोरोना बाधित आढळला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १९ वर पोहचली आहे. तर दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २१९ वर पोहचला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र यानंतर कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात स्थानिक रुग्णांचे फार कमी होते. मात्र आता स्थानिक रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.रविवारी आढळलेल्या एकूण तीन कोरोना बाधितांमध्ये दोन तिरोडा येथील सुभाष वॉर्ड येथील एक आणि ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तिरोडा तालुका आणि शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एक रुग्ण हा देवरी तालुक्यातील आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८१७९ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २४७ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.७७७४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.६३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.१०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण २१९ जण कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्ह्यात आता एकूण २८ कंटेन्मेंट झोन आहेत.१२११ जणांची रॅपिड अँटीजेन टेस्टकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या आणि संशयितांच्या स्वॅब नमुन्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत १२११ जणांची अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १२०४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. तर ७ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे.देवरीत जनता कर्फ्यूदेवरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने येथील नागरिकांनी स्वत: हून पुढाकार घेत शनिवारपासून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे देवरी येथील संपूर्ण बाजारपेठ व छोटी मोठी सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या