तिरोडा व देवरी तालुक्यात कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:35+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र यानंतर कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात स्थानिक रुग्णांचे फार कमी होते. मात्र आता स्थानिक रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.

Increased coronation in Tiroda and Deori talukas | तिरोडा व देवरी तालुक्यात कोरोनाबाधितांची भर

तिरोडा व देवरी तालुक्यात कोरोनाबाधितांची भर

ठळक मुद्देदोन कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : ७७७४ नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (दि.२६) तिरोडा तालुक्यात दोन तर देवरी येथे एक कोरोना बाधित आढळला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १९ वर पोहचली आहे. तर दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २१९ वर पोहचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. मात्र यानंतर कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात स्थानिक रुग्णांचे फार कमी होते. मात्र आता स्थानिक रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.रविवारी आढळलेल्या एकूण तीन कोरोना बाधितांमध्ये दोन तिरोडा येथील सुभाष वॉर्ड येथील एक आणि ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तिरोडा तालुका आणि शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एक रुग्ण हा देवरी तालुक्यातील आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ८१७९ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २४७ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.७७७४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.६३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.
१०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण २१९ जण कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्ह्यात आता एकूण २८ कंटेन्मेंट झोन आहेत.

१२११ जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या आणि संशयितांच्या स्वॅब नमुन्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत १२११ जणांची अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १२०४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. तर ७ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे.
देवरीत जनता कर्फ्यू
देवरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने येथील नागरिकांनी स्वत: हून पुढाकार घेत शनिवारपासून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे देवरी येथील संपूर्ण बाजारपेठ व छोटी मोठी सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.

Web Title: Increased coronation in Tiroda and Deori talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.