आधुनिक शेतीकरु न आपले उत्पन्न वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:37+5:30
नक्षल दमन विरोधी सप्ताह निमीत्त डुग्गीपार पोलीस ठाण्याच्यावतीने ग्राम बाम्हणी-खडकी येथे शुक्रवारी (दि.२४) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या मेळाव्याला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, डुग्गीपारचे ठाणेदार विजय पवार उपस्थित होते.

आधुनिक शेतीकरु न आपले उत्पन्न वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : ङ्क्तनक्षल चळवळीतून कुणालाही काहीच साध्य झाले नसून नक्षल चळवळ समाजासाठी घातक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. शासनाने त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठीही विविध योजना असून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकरून उत्पन्न वाढवावे असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
नक्षल दमन विरोधी सप्ताह निमीत्त डुग्गीपार पोलीस ठाण्याच्यावतीने ग्राम बाम्हणी-खडकी येथे शुक्रवारी (दि.२४) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या मेळाव्याला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, डुग्गीपारचे ठाणेदार विजय पवार उपस्थित होते.
मौजा राजगुडा, मंदिटोला, मोगरा, खडकी, बाम्हणी व दल्ली येथील शेतकरी बांधवाकरीता आयोजि या मेळाव्यात पवार यांनी, नक्षल दमन सप्ताह साजरा करण्याची पार्श्वभूमी व नक्षल दमन सप्ताहात पोलिसांनी घेतलेल्या विविध कार्यक्रमांबाबत प्रास्ताविकातून माहिती मांडली.
पात्रीकर यांनी, आधुनिक शेती सोबतच सांघिक शेती करून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घेता येईल, शासनाच्या विविध कृषी योजना व कृषी विमाबाबत मार्गदर्शन केले. ढोले यांनी, नक्षल विचारसरणीला बळी न पडता लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांबद्दल विश्वास वाढवा व मुख्य प्रवाहात येवून स्वत: सोबत समाज व जिल्हयाचा विकास करून घ्यावा असे सांगीतले. याप्रसंगी नक्षल प्रोपगंडा सेलच्या कर्मचाऱ्यांनी नक्षल विरोधी पत्रकांचे वाटप केले.
आभार पोउपनि धैर्यशील साळुंके यांनी मानले. याप्रसंगी माजी उपसभापती विलास शिवनकर, राजगुडाचे सरपंच मोहन सुरसाऊत, बाम्हणी सरपंच प्रतिमा कोरे, पोलीस पाटील सुरेश बोरकर, पोउपनि. ज्योती सुरनर यांच्यासह ग्राम राजगुडा, मंदिटोला, मोगरा, खडकी, बाम्हणी, दल्ली येथील शेतकरी व ईतर प्रतिष्ठीत नागरीक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.