प्लॅटफॉर्मची उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:12+5:30
गाडीच्या डब्यांच्या पायऱ्यांच्या उंची एवढे फलाट असल्यास नागरिकांना सोयीचे राहते. मात्र येथील रेल्वे स्थानक तसे नाही. परिणामी डब्यांत चढणे व उतरणे कठीण झाले आहे. अनेक वेळा वृद्ध प्रवासी पडून स्वत:चा जीव गमावल्याचे प्रसंग झाले. कारण स्थानकाची उंची कमी आहे.

प्लॅटफॉर्मची उंची वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : येथील रेल्वे स्थानक आजही जुनेच असून येथील प्लॅटफॉर्म जमिनीच्या समतल असल्याने रेल्वेत चढायला आणि उतरायला प्रवाशांना त्रास होतो. अशात प्रवासी पडतात आणि कित्येकदा जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा ,अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
गाडीच्या डब्यांच्या पायऱ्यांच्या उंची एवढे फलाट असल्यास नागरिकांना सोयीचे राहते. मात्र येथील रेल्वे स्थानक तसे नाही. परिणामी डब्यांत चढणे व उतरणे कठीण झाले आहे. अनेक वेळा वृद्ध प्रवासी पडून स्वत:चा जीव गमावल्याचे प्रसंग झाले. कारण स्थानकाची उंची कमी आहे. नागभीड विभागांंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच स्थानकाची उंची सदर विभागाने वाढवून प्रवाशांना सोयीचे करुन दिले आहे. तसेच काम येथील स्थानकाचे करुन द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
या स्थानकावरुन अनेक विद्यार्थी, शासकीय कर्मचारी व मजूर हजारोंच्या संख्येत प्रवास करतात. त्यामुळे स्थानकाची उंची वाढवा अशी मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, सुकळी, ब्राम्हणटोला येथील गावकऱ्यांची आहे.