शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:39+5:302021-01-25T04:30:39+5:30

लक्ष लागले आता नुकसान भरपाईकडे केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी ...

Increase the age limit for peon recruitment | शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

लक्ष लागले आता नुकसान भरपाईकडे

केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धान पिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अपकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईकडे लागले आहे.

शेंडा परिसरात नेटवर्कची समस्या

सडक -अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदिटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरी, सिंदिपार, सलाईटोला, मुशानझोरवा या गावात टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते.

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा

तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मोकाट जनावरांमुळे बाजारपेठेत जास्तच त्रास असून वाहतूक विस्कळीत होते. ही जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्याची मागणी आहे.

स्मशान शेड केव्हा तयार करणार

मुंडीकोटा : नवेगाव (खुर्द) येथे बऱ्याच वर्षांपासून स्मशान शेड नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची मोठी अडचण निर्माण होते. स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. पण त्याची अद्यापही पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे. नवेगाव येथील काही जण ४ किमी अंतरावर माडगी वैनगंगा नदीच्या काठावर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेतात. गावाबाहेर स्मशानभूृमीची जागा आहे पण त्याठिकाणी स्मशान शेड नाहीत. उन्हाळ्यात व पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. येथील सरपंचांनी मागील १० वर्षापूर्वी ग्रामपंचायतचा ठराव शासनाकडे दिला होता.

कलावंतांना मानधनास आताही विलंबच

बाराभाटी : गावागावात कलावंतांचा जन्म होतो, आपली कला सादर करुन ते जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाह करतात. ५० वर्ष वय झाले की शासनाकडून वृद्ध कलावंत मानधन योजनेचा लाभ प्रत्येक कलाकाराला मिळतो. पण गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदमध्ये समाजकल्याण समिती गठित नाही म्हणून वृद्ध कलाकार मानधन समिती गठित करण्याची मागणी आहे.

कचरापेट्या कचऱ्याने बरबटलेल्या

केशोरी : येथील ग्रा.पं.स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकांत कचरापेट्या बसविण्यात आल्या. मात्र त्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या बरबटलेल्या आहेत.

रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बार मागे, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडला असतो. याकडे तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे.

एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रावर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र या निर्देशांचे पालन केले जात नाही.

योग्य लाभार्थी घरकुलापासून वंचित

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील घोगरा परिसरात घरकुलांचा लाभ मिळावा असे अनेक गरजू अजूनही प्रतीक्षेत आहेत. जीर्ण घर कोसळण्याच्या अवस्थेत असूनही त्यांचा त्याच परिस्थितीत दिवस काढावे लागत आहे. या गरजू घरकूल लाभार्थ्यांची संख्या मोठी असून घरकुलांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी गरजू लाभार्थ्यांनी केली आहे.

Web Title: Increase the age limit for peon recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.