अपूर्ण भूमिगत बंधाऱ्याचे लोकार्पण

By Admin | Updated: March 14, 2015 01:20 IST2015-03-14T01:20:45+5:302015-03-14T01:20:45+5:30

तिरोडा तालुक्यातील आदिवासी परिसरातील नवेझरी येथे बांधण्यात आलेला भूमिगत बंधारा अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाले, ...

Incomplete underground bundle | अपूर्ण भूमिगत बंधाऱ्याचे लोकार्पण

अपूर्ण भूमिगत बंधाऱ्याचे लोकार्पण

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील आदिवासी परिसरातील नवेझरी येथे बांधण्यात आलेला भूमिगत बंधारा अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाले, असे दाखवून सदर बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.
पाटबंधारे स्थानिकस्तर तिरोडा विभागांतर्गत नवेझरी येथील नाल्यावर स्मशानभूमीजवळ भूमिगत बंधाऱ्याचे काम मंजूर झाले होते. या कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. लाखो रुपये खर्च करून बांधलेला बंधारा एकदम निकृष्ट दर्जाचा असून बाजूला ओबडधोबड काम दाखवून भिंतीही बरोबर घेतलेल्या नाहीत. त्यामुळे सदर बंधाऱ्यात पाणी अडले जाणार का? हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. बंधाऱ्याला एकच लहान दरवाजा ठेवला आहे. त्याला प्लॉटसुध्दा लावण्यात आला नाही. त्यामुळे असे अपूर्ण काम कंत्राटदाराने करूनसुध्दा या कामाचे पाटबंधारे विभागाने लोकार्पण कसे केले? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सर्व गावकरी आणि ग्राम मंडळाचे पदाधिकारी यांनी सदर बंधाऱ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Incomplete underground bundle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.