महारेशीम अभियानात २९ गावांचा समावेश
By Admin | Updated: March 23, 2017 01:05 IST2017-03-23T01:05:48+5:302017-03-23T01:05:48+5:30
महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे महारेशीम अभियान ७ ते २५ मार्चपर्यंत राबविण्यास

महारेशीम अभियानात २९ गावांचा समावेश
रेशीम विकास रथ : ६५९ शेतकऱ्यांना दिली रेशीम उद्योगाची माहिती
गोंदिया : महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे महारेशीम अभियान ७ ते २५ मार्चपर्यंत राबविण्यास जिल्हा रेशीम कार्यालयास नागपूर संचालनालयातून कळविण्यात आले. त्यानुसार जिल्हा रेशीम कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत पाच समुहातील २९ गावांमध्ये कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाची माहिती देण्यात आली.
महारेशीम अभियानाचे उद्घाटन नायब तहसीलदार ए.एस. पाटील, एन.एम. गावड, नायब तहसीलदार यावलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रेशीम विकास रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाची सुरूवात करण्यात आली. या वेळी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा रेशीम कार्यालयांतर्गत एकूण पाच समूह असून त्यापैकी प्रत्येक समुहात समाविष्ट गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. अर्जुनी-मोरगाव-१ या समुहात सात गावांत कार्यक्रम घेण्यात आले. त्यात १२६ शेतकरी उपस्थित होते. अर्जुनी-मोरगाव-२ समुहातील पाच गावांत कार्यक्रम घेण्यात आले. त्यात ९४ शेतकरी उपस्थित होते. अर्जुनी-मोरगाव-३ या समुहातील पाच गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. त्याचा लाभ ११० शेतकऱ्यांनी घेतला. सिरेगाव-१ समुहातील आठ गावांत कार्यक्रम घेण्यात आले, याचा लाभ तब्बल २३५ शेतकऱ्यांनी घेतला. तर सिरेगाव-२ समुहात चार गावांमध्ये झालेल्या कार्यक्रमात ९४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला.
९ ते २१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण २९ गावांमध्ये महारेशीम अभियान राबविण्यात आले. संबंधित जुने व नवीन इच्छुक शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासंबंधी माहिती देण्यात आली. तसेच त्यांना रेशीम उद्योगाचे पॉम्प्लेट्स, पुस्तकेसुद्धा वाटप करण्यात आली.
टसर रेशीम उद्योगातील सर्वच माहिती जसे अंडीपूंज उत्पादन माहिती, अनुदानाची माहिती, तसेच शासनाच्या सीडीपी योजना, पीक विमा योजना, कोष उत्पादन याबाबतची माहिती लाभार्थी व शेतकऱ्यांना देण्यात आली. (प्रतिनिधी)
कार्यक्रम घेण्यात
आलेली गावे
रेशीम उद्योगाबाबत कार्यक्रम घेण्यात आलेल्या गावांमध्ये अरततोंडी, केशोरी, चिचगड, झाशीनगर, परसटोला, जेठभावडा, आमगाव (आदर्श), मकरधोकडा, शिलापूर, तिडका, करडगाव, ताडगाव, बोद्रा, धाबेटेकडी, देऊळगाव, विहीरगाव, दाभना, बोळदे (करड), सिलेझरी, निमगाव, झरपडा, नवेगावबांध, एलोडी, जांभळी, चान्ना, भिवखिडकी, मुंगली, सोनका व सालई यांचा समावेश आहे. यात एकूण ६५९ शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाची माहिती देण्यात आली. यात सुरूवातीची सहा गावे नवीन असून उर्वरित २३ गावे जुनी टसर रेशीम उद्योगाशी संबंधित आहेत.