शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसामुळे शहर चिखलात

By admin | Updated: February 12, 2015 01:18 IST

पहाटे बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरिही दुसरीकडे मात्र शहर चिखलात दिसून आले.

गोंदिया : पहाटे बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरिही दुसरीकडे मात्र शहर चिखलात दिसून आले. शहरातील कित्येक रस्त्यांवर पाणी साचल्याचे बुधवारी (दि.११) दिसून आले. पाण्याच्या निकासाची योग्य व्यवस्था नसल्याने पावसाचे रस्त्यावरच अडकून होते व त्याचा फटका मात्र शहरवासीयांना सहन क रावा लागला. बुधवारी (दि.११) पहाटे पाच वाजतापासून वरूणदेव चांगलेच बरसले. या अवकाळी पावसामुळे पावसाळा सुरू झाल्यासारखे वातावरण बघावयास मिळाले. आनंददायक वातावरण निर्माण झाले असतानाच मात्र दुसरीकडे शहरात पाणीच पाणी दिसून आले. कित्येक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचूनच होते. त्यामुळे नागरिकांना चिखलातूनच आपली वाट काढावी लागत असल्याचे चित्र दिसले. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील रस्त्यांची तशीही दुर्गत झालेली असताना त्या खड्यांत पावसाचे पाणी साचून चिखल झाला होता. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांचे कपडे चिखलाने माखत असल्याचेही दिसले. तर नेहरू चौकात पाण्याची निकासी होऊ न शकल्याने नेहरूजींच्या पुतळ््या समोरून रस्त्याच्या कडेला चांगलेच पाणी साचले होते. मुख्य मार्ग असल्याने येथे चांगलीच वर्दळ असते व पाणी साचून असले तरिही लोकांच्या अंगावर पाणी उडवत वाहनांनी आपली वाट पकडली. पाण्याच्या निकासीची योग्य व्यवस्था नसल्याने हा सर्व प्रकार घडत असून पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागला. (शहर प्रतिनिधी)अंडरग्राऊंड मार्ग पाण्यात अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले असतानाच अंडरग्राऊंड मार्ग मात्र पाण्या खाली आले होते. पावसाचे पाणी नाल्यांतून या मार्गा लगतच्या सरकारी तलावात जाते. अचानक आलेल्या या पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढली व ओव्हरफ्लो होऊन पाणी थेट रस्त्यावर आले. या रस्त्यावरील हा नेहमीचाच प्र्रकार आहे. पाणी रस्त्यावर आल्यामुळे मात्र येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागला.