शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

गोंदियामध्ये १४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित तर आठ कायमचे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 16:44 IST

भरारी पथकाची कारवाई : अनियमितता करणे भोवले, कृषी विभागाची धडक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी- बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथकं स्थापन केली आहेत. भरारी पथकांमार्फत अचानक तपासणी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित तर आठ केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. 

कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यांमध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहीत मुदतीत नूतणीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, विक्री करीत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, परवाना घेऊनसुद्धा आर्थिक वर्षात एकदाही व्यवहार न करणे आदी कारणांमुळे १४ निविष्ठाधारकांचे परवाने दोन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले आले.

या कृषी केंद्राचे परवाने दोन महिन्यांसाठी रद्दहर्षित ट्रेडर्स कृषी केंद्र काटी, ता. गोंदिया (बियाणे), रतनेरे कृषी केंद्र मरारटोला, ता. गोंदिया (बियाणे), हिमेश कृषी केंद्र भदयाटोला, ता. गोंदिया (बियाणे व कीटकनाशके), जय किसान कृषी केंद्र बनाथर, ता. गोंदिया (बियाणे व कीटकनाशके), पवन कृषी केंद्र वडेगाव, ता. गोंदिया (बियाणे व कीटकनाशके), मनोज कृषी केंद्र चिरामणटोला, गोंदिया (बियाणे व कीटक- नाशके), माँ. भगवती कृषी केंद्र खातीया, ता. गोंदिया (खत व कीटक- नाशके), मांडोदेवी कृषी केंद्र, ता. सालेकसा (खत), उपराडे कृषी केंद्र निंबा, ता. सालेकसा (खत) असे एकूण १४ परवाने दोन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले आहेत.

कृषी विभागाकडे करा तक्रारकृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिंकिंग केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांनी अधिकृत पर- वानाधारक कृषी सेवा केंद्राकडून खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करतांना कृषी निविष्ठा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिलं घ्यावीत.

या केंद्राचे परवाने कायमचे रद्दभुवन कृषी केंद्र रावणवाडी, ता. गोंदिया बियाणे परवाना यांचे कायद्यांतर्गत तर चव्हाण कृषी केंद्र, चिल्हाटी ता. गोरेगाव (खत), अनुराग कृषी केंद्र कालीमाटी, ता. गोरेगाव (खत), संजीवनी कृषी केंद्र. हिरापूर, ता. गोरेगाव (खत), जय बजरंग कृषी केंद्र, कालीमाटी, ता. गोरेगाव (खत), गुरु माऊली कृषी केंद्र, घुमर्रा, ता. गोरेगाव (खत), श्रीकांत कृषी केंद्र अर्जुनी / मोरगाव (बियाणे व कीटकनाशके) परवाना विनंतीनुसार, असे एकूण ८ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.

एमआरपीप्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपीपेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. त्याची तत्काळ दखल घेऊन बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशके नियम १९७१ नुसार कार्यवाही करण्यात येईल.- मंगेश वावधने, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFertilizerखतेFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया