Implement the Code of Conduct | आचार संहितेची अंमलबजावणी करा
आचार संहितेची अंमलबजावणी करा

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : जिल्ह्यात १० लक्ष ९६ हजार ४४१ मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २१ ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्हयातील चार विधानसभा क्षेत्रात मतदान होणार असून २४ आॅक्टोबर रोजी मतगणना असा कार्यक्र म निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणूकीबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी (दि.२१) आयोजित पत्रपरिषदेत उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. बलकवडे यांनी, भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सूचनांची माहिती देऊन आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कारणासाठी केला जाणार नसल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची सूचना सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आली आहे. त्याबाबत कार्यवाही सुद्धा करण्यात येत आहे. जिल्हयातील संवेदन व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाची नजर आहे. तसेच मद्य विक्र ी तथा अवैध मद्य विक्र ीवर संबंधित विभागाचे लक्ष्य असून आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कृती कोणत्याही शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्या कडून होता कामा नये असे निर्देश नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारांना निवडणूक कालावधी दरम्यान प्रत्येकी २८ लक्ष रु पये खर्च करता येईल. तसेच त्यापैकी रोख १० हजारच्यावर खर्च करता येणार नाही म्हणून निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक खर्च सनियंत्रण समिती तसेच प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीसह इतर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
तसेच नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज असून आगामी निवडणुका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यात येईल. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेयर व त्यांच्या मागणीनूसार इतर सोयी-सुविधा उपलब्ध करु न देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
तसेच नागरीकांच्या विविध प्रश्न व शंका असल्यास १९५०@ या टोल फ्री क्रमांकावर तथा अधिक माहितीसाठी सांकेतीक स्थळावर भेट द्यावी असेही त्यांनी सांगीतले. सदर बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपअधीक्षक पोलिस (गृह) सोनाली कदम, नायब तहसीलदार आर.एस पटले, हरिशचंद्र मडावी आदि उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्र ारीसाठी मोबाईल सीव्हीजील अ‍ॅप
या निवडणुकीत नागरीकांना निवडणुकी संदर्भात तक्र ारीसाठी सीव्हीजील या नावाने एंड्रॉईड मोबाईल अ‍ॅप लाँच करण्यात आली आहे. सदर एप्लीकेशन मध्ये नोंदणी करु न तक्रारदार हे लाईव्ह व्हिडीयो तथा फोटो अपलोड करु न तक्रार करु शकतात. प्राप्त तक्रारी नंतर १०० मिटर मध्ये कायर्वाही करण्यात येईल. तसेच तक्रारीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची सूचना वेळो-वेळी तक्रारदारास देण्यात येईल. नागरीकांची नावे गुप्त ठेवण्यासाठी सदर अ‍ॅपमध्ये सुविधा देण्यात आली आहे.

१२८१ मतदान केंद्र व सेनादलातील १७९२ मतदार
जिल्हयातील चार विधानसभा मतदार संघात एकूण १२८१ मतदान केंद्र असून गोंदिया विधानसभा मतदार संघातील खमारी येथे जि.प. केन्द्र प्राथमिक कन्या शाळा, खोली क्र मांक २ मध्ये एक सहायक मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हयात चारही विधानसभा क्षेत्रात सेनादलातील एकूण १९७२ मतदार असल्याची माहिती दिली.


Web Title: Implement the Code of Conduct
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.