अपूर्ण कालव्यांमुळे सिंचनाला फटका

By Admin | Updated: December 15, 2014 22:57 IST2014-12-15T22:57:47+5:302014-12-15T22:57:47+5:30

गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील

Impact of irrigation due to incomplete canals | अपूर्ण कालव्यांमुळे सिंचनाला फटका

अपूर्ण कालव्यांमुळे सिंचनाला फटका

५० टक्केच काम : शेतीला पाणी मिळणे झाले दुरापास्त
सालेकसा : गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे.
या प्रकल्पाला कार्यान्वित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. परंतु कालव्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय या प्रकल्पाचे काही औचित्य नाही. कालव्यांशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कधीही पोहोचू शकत नाही.
बेवारटोला जलाशयाचे मुख्य दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याचे काम केवळ ४ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. मुंशीटोला (दलदलकुही) पर्यंतच हे काम करण्यात आले आहे. हा कालवा आतासुद्धा तुटक्याफुटल्या व अपूर्ण बांधकाम झालेल्या स्थितीत आहे. तरीसुद्धा या कालव्यातून जवळपास २०० एकर शेतजमिनीस सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
उजव्या कालव्याचे काम चांदसूरज गावापर्यंत करण्यात आले आहे. यानंतरही याचे काम अपूर्णच आहे. या ठिकाणापर्यंत कालव्यासाठी जमीन खोदून अपूर्ण ठेवण्यात आले आहे. चांदसूरजच्या पुढे कालवा नेण्यासाठी रेल्वे लाईनच्या खाली अंडरग्राऊंड खोदकाम करावे लागणार आहे.
चांदसूरजच्या पुढे विचारपूर, ढुबरूटोला, कोपालगड, दल्लीटोला, मुरझाटोला, जमाकुडो, भर्रीटोला, ुतुरमुळीटोलापर्यंत हा कालवा जाणार आहे. या कालव्याचे जवळपास १० ते १२ किमी लांब काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही.
कालव्याच्या कामाचे सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही.
जवळपास १५ वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात या प्रकल्पाच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाचा खर्च केवळ नऊ कोटी रूपये होती. परंतु आता याची किंमत ६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. प्रकल्पाला जर पूर्ण करण्यात आले तर केपीटोला (पिपरिया) येथील कुआढास प्रकल्पालासुद्धा नवसंजीवनी मिळू शकेल. कुआढास प्रकल्पापासून जवळपास एक हजार हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होवू शकेल.
बेवारटोला प्रकल्पापासून दर्रेकसा, जमाकुडो व टोयागोंदी पंचायतीच्या जवळपास एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ मिळू शकेल. (प्रतिनिधी)

Web Title: Impact of irrigation due to incomplete canals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.