शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

गोंदिया  जिल्ह्यात कोविड काळात अवैध रेती वाहतुकीला उधाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 3:34 PM

Gondia News सध्या ग्रामीण भागात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असून कोणतेही अधिकारी व कर्मचारी ग्रामीण भागात फिरताना दिसत नाही. याचाच फायदा घेत तालुक्यातील बटाणा, मुंडीपार, अंभोरा घाटावरुन अवैध रेती चोरीला उधाण आले असून त्यात रेती माफियांचे चांगलेच फावले असून रेती तस्करीला उधाण आले आहे.

ठळक मुद्देबटाना, मुंडीपार,अंभोरा घाटातील प्रकार महसूल विभागाचे दुर्लक्ष

..

लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : सध्या ग्रामीण भागात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असून कोणतेही अधिकारी व कर्मचारी ग्रामीण भागात फिरताना दिसत नाही. याचाच फायदा घेत तालुक्यातील बटाणा, मुंडीपार, अंभोरा घाटावरुन अवैध रेती चोरीला उधाण आले असून त्यात रेती माफियांचे चांगलेच फावले असून रेती तस्करीला उधाण आले आहे.

गोंदिया तालुक्याची जीवनदायनी म्हणून पांगोली नदीची ओळख आहे. ही नदी जवळच्या बटाना, मुंडीपार व अंभोरा गावाजवळून वाहते. मागच्या वर्षी आलेल्या पुरामुळे या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक झालेली आहे. सध्या नदीपात्र कोरडे असल्यामुळे ही रेती चोरट्या मार्गाने या गावातील ट्रॅक्टर मालक वाहतूक करीत आहेत. सध्या कोरोना काळ असल्यामुळे महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी या भागात फिरकत नाही.

याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारात ही चोरटी रेती वाहतूक अधिकच जोमाने सुरू असते. या अवैध रेती चोरांनी नदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ते तयार करुन बिनधास्तपणे रेती चोरी करीत असून त्याची चढ्या दराने विक्री करीत आहे. अनेकांनी तर रेतीची मोठी साठवणूक केल्याची माहिती सुद्धा उघड झाली आहे. या अवैध रेती वाहतुकीची माहिती पोलीस विभागाला सुद्धा त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. रेती तस्करांच्या मुसक्या आवळून अवैध रेती चोरीला लगाम लावण्याची मागणी बटाना, मुंडीपार व आंभोरा येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :sandवाळू