शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यात अवैध रेती वाहतूक

By admin | Updated: November 18, 2014 22:58 IST

तिरोडा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला मोठ्या प्रमाणात ऊत आली आहे. या अवैध वाहतुकीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमेटी क्रीडा सेलचे अध्यक्ष प्रा. विलास

सुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला मोठ्या प्रमाणात ऊत आली आहे. या अवैध वाहतुकीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमेटी क्रीडा सेलचे अध्यक्ष प्रा. विलास दुर्योधन मेश्राम यांनी केला आहे. तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारे शासकीय कामे व प्रत्येक व्यक्तीला गरज असणारी सुव्यवस्थित घरे यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची आवश्यकता भासते. आधुनिक युगात प्रत्येक बांधकामात सिमेंट-काँक्रिट तयार करण्यासाठी रेतीचा वापर होते. रेतीची निंतात आवश्यकता असल्यामुळे व मागूनही न मिळाल्याने सरतेशेवटी चोरी करणे भाग पडते. त्यातूनच अवैध शब्दाची उत्पत्ती होवून अवैध कामे करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले जातात. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, अजूनपर्यंत रेती घाटांना शासनाकडून मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लिलाव करण्यात आलेला नाही. यालाच मुख्य अडचण म्हणजेच रेती घाट असणाऱ्या गावांकडून प्राप्त न झालेले ग्रा.पं.चे ठराव. ग्रा.पं. ठराव न देण्याचे कारण म्हणजे त्या गावात उद्भवणारी समस्या आहे. गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकीमुळे मोठेमोठे खड्डे पडलेले आहे. वाहतुकीमुळे गावात धुळीचे साम्राज्य पसरते. या प्रकाराने वातावरण दूषित होवून गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आजार होण्याची शक्यता असते. ज्या गावातून ठराव मागितला जातो, त्या गावाची होणारी दुर्दशा प्रथम सोडविण्याचे काम प्रशासनाने करायला हवे. त्या गावाची होणारी अडचण भागवली तर रेती घाट लिलावास होणारी अडचण निर्माण होणार नाही. तसेच अवैध रेती वाहतूकही करावी लागणार नाही. सदर प्रकाराकडे संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आवश्यक बाब समजून लक्ष घालावे. त्वरीत त्या गावातील अडचणींचे निवारण करावे. असे झाल्यास या भागातील रेतीघाटांवरून होणाऱ्या रेतीच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्याचा प्रसंगच निर्माण होणार नाही, असा विश्वास गोंदिया जिल्हा काँग्रेस कमेटी क्रीडा विभागाचे अध्यक्ष प्रा. विलास मेश्राम यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)