डुंडा जंगलातून अवैध वृक्षतोड सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:28+5:302021-02-05T07:46:28+5:30

भंभोळी ते चांदोरी रस्त्याची दुरुस्ती करा मुंडीकोटा : जवळील ग्राम भंभोळी ते चांदोरी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून हा ...

Illegal logging continues in Dunda forest | डुंडा जंगलातून अवैध वृक्षतोड सुरुच

डुंडा जंगलातून अवैध वृक्षतोड सुरुच

भंभोळी ते चांदोरी रस्त्याची दुरुस्ती करा

मुंडीकोटा : जवळील ग्राम भंभोळी ते चांदोरी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून हा रस्ता जीर्ण झाला आहे. रस्ता पूर्णपणे उखडला असून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकायदायक ठरत आहे.

निराधार लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले

अर्जुनी मोरगाव : कोरोनामुळे घराबाहेर पडू शकत नसलेल्या वृद्ध व दिव्यांगांना विशेष सहाय्य्य योजनेचा लाभ मिळवून देता यावा यासाठी ‘गृहभेट आपुलकीची’ ही संकल्पना अंमलात आणली जात आहे.

बसस्थानक ठरत आहे शोभेची वास्तू

गोरेगाव ­: शहरात १०-१२ वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून बसस्थानकांची निर्मिती करण्यात आली. या बसस्थानकावर आजघडीला कुणीही कर्मचारी राहत नाही तसेच गोरेगावमार्गे जाणाऱ्या बस या स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात बसस्थानकाची बांधणी झाल्यावर बऱ्याच दिवसांनी बसथांबा होता पण आजघडीला या स्थानकावर बसचा थांबा नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेला प्रवासी निवारा शोभेची वास्तू ठरत आहे. या बसस्थानकावर एस.टी.चा थांबा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दिव्यांग- निराधारांवर उपासमारीची पाळी

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सजंय गांधी, श्रावणबाळ, विधवांना,आर्थिक कुटुंब सहाय्यांना ४-५ महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. निराधारांची ना काम-ना पैसा अशी स्थिती झाली आहे.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणांची समस्या वाढली असून रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहने बाहेर काढणे कठीण होत आहे.

तंटामुक्त समितींचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष

गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहीम सुरू केली. यांतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीसरूपात रक्कम दिली. मात्र, गाव तंटामुक्त झाले व बक्षिसांची रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष आहे.

शेतकरी प्रशिक्षण मेळावा

गोरेगाव : तालुक्यातील ग्राम घोटी येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वजीत डोंगरे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृषी योजनांची माहिती दिली.

Web Title: Illegal logging continues in Dunda forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.