शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

नवरात्रौत्सवात महिलांचा दुर्गावतार ! चाकू उगारणाऱ्या दारू विक्रेत्याला महिलांनी दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 6:10 PM

गावात दारूबंदी असतानाही अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्याला जाब विचारायला गेलेल्या महिलांवर त्यात दारू विक्रेत्याने चाकू उगारला असता महिलांनी दारू विक्रेत्याला चांगलाच चोप दिल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील डव्वा या गावात घडली आहे.

गोंदिया : नवरात्रौत्सवात (Navratri) महिलांचा दुर्गावता पहायला मिळाला आहे. गोरेगाव तालुक्यातील डव्वा गावात दारू बंदी असतांना अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याला जाब विचारायला गेलेल्या महिलांवर दारू विक्रेत्याने चाकू उगारला. यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी दारू विक्रेत्याला चांगला चोप दिला.

गावात दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हेच लक्षात घेत डव्वा येथे महिलांनी दारू बंदी समिति स्थापन करून दारु विक्रिस विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या समितिला डव्वा येथील बसस्टॉपच्या मागे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गावातील महिला घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी महिलांनी दारू विक्रेत्याला जाब विचारला असता दारू विक्रेत्यानी चाकू काढत शस्त्र दाखवून धाक दाखवायचा प्रयत्न केला.

मात्र, चाकूच्या धाकाला महिला अजिबात घाबरल्या नाहीत व त्यांनी दारू विक्रेत्याला धू धू धुतले. महिलांच्या अंगात जणु दुर्गा सरसावली असल्याचे दिसून आले आणि महिलांनी त्या दारू विक्रेत्याला चांगला चोप देत हुसकावून लावले. या घटने प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दारू विक्रेत्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी