शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध दारु विक्रीला आला आहे ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:54 IST

राज्य उत्पादन शुल्क विभाग सुस्त : पोलिस विभागाकडून सातत्याने कारवाया

लोकमत न्यूज नेटवर्क गोदिया : कोणतीही निवडणूक म्हटले की, दारू, पार्ष्या व पैशांचा महापूर राहतो. त्याच्या पूर्ततेसाठी परवानाप्राप्त दारूऐवजी गावठी, हातभट्टीच्या दारूवर अधिक भर दिला जातो. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात, गावखेड्यात, दुर्गम भागात गावठी दारूच्या भट्टया पेटल्या आहेत. या भट्टया विझविण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागापुढे आहे.

नुकताच पावसाळा संपल्याने सर्वच नदी-नाल्यांना पाणी आहे. याच नदी नाल्यांच्या काठावर व आश्रयाने गावठी हातभट्टीच्या दारूच्या भट्टया पेटविल्या जात आहेत. खास निवडणुकीत मतदारांना, कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी ही दारू काढली जात असून, चोरट्या मार्गाने त्याचा पुरवठा होणार आहे. दाट जंगलाचा आश्रय घेऊन या भट्टया पेटविल्या गेल्याने सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत.

या अवैध दारूविक्रीला ब्रेक लावून परवानाप्राप्त दारूची अधिकाधिक विक्री करण्याची जबाबदारी कायद्याने राज्य उत्पादन शुल्क विभागावर सोपविली आहे. मात्र या विभागाकडून कारवाया केल्या जात असल्याचे ऐकिवात नाही. उलट पोलिस विभागाकडून मात्र दररोज अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाया केल्या जात असल्याचे कारवायांतून दिसून येत आहे. 

निवडणूक काळात तरी 'मिनी बार' बंद होईल का ? 

  • शहरात परवानाप्राप्त देशी-विदेशी, वाइन बार, बिअर शॉपी आहेत. नियमानुसार या शॉपमधून पॅक दारू। घेऊन जाणे एवढेच अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या शॉपच्या आजूबाजूलाच दारू पिण्याची छुपी व्यवस्था केलेली असते. 
  • त्यासाठी डिस्पोजल ग्लास, चकनासुद्धा उपलब्ध करून दिला जातो. शहरातील ऑम्लेटच्या गाड्यांवर सर्रास अवैधरीत्या दारू विकली जाते. 
  • अनेक ठिकाणी तर पोलिस ठाण्यासमोर आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे हे मिनी बार सुरू असतात. निवडणूक काळात एक्साइज, पोलिस व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट असते. रात्री लवकरच नाकाबंदी सुरू होते. किमान या काळात तरी शहरच नव्हे तर ग्रामीण भागात सर्वदूर पसरलेले हे मिनी बार बंद होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दररोज होत आहेत कारवायासध्या पोलिस विभागाकडून दररोज अवैध दारू विक्रेत्यांना दणका दिला जात आहे. त्यातही आता निवडणूक बघता दारू गाळण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांनी साठवून ठेवलेले मोहफुल व दारू पोलिसांकडून जप्त करून नष्ट केले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कारवाया करणे अपेक्षित असताना मात्र आपला बंदोबस्त सांभाळून पोलिसांना आता अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसळ्या आवळण्यासाठी कारवाया कराव्या लागत असल्याचे चित्र आहे

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४liquor banदारूबंदीgondiya-acगोंदिया