नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST2021-05-06T04:31:02+5:302021-05-06T04:31:02+5:30
गोंदिया : जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू आहे. या महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींकरिता वसतिगृह आहे. मात्र, ...

नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे दुर्लक्ष
गोंदिया : जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरू आहे. या महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींकरिता वसतिगृह आहे. मात्र, वसतिगृहातील अधीक्षक व इतर कर्मचारी कर्तव्याला बुट्टी मारतात. रात्रीच्या वेळेस कुणीही हजर राहत नसल्याचा आरोप आहे. कर्मचारी नागपूरवरून ये-जा करतात. यामुळे विद्यार्थिनींचा आरोग्यासह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात तक्रार केल्यावरही कसलीही दखल घेतली जात नाही. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक शासकीय नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा व आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसतिगृहात कार्यरत वॉर्डन कर्तव्य बजावत नसल्याचा आरोप आहे. रात्रीबेरात्री एखाद्या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, तर तिची फिर्याद ऐकण्यास कुणीही जबाबदार वसतिगृहात हजर राहत नाही. एकंदरीत, या प्रकारामुळे नर्सिंग महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात तक्रार केली तरी तक्रारीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी त्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.