शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रांचे टार्गेट पोर्टलवर जुळेना, खरेदी काही सुरू होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 20:06 IST

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ धान खरेदी करते. यंदाच्या खरीप हंगामापासून धान खरेदी करण्यासाठी शासनाने मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे तेवढेच धान खरेदी करता येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी केंद्रांना दिलेले खरेदी उद्दिष्ट आणि शासनाला पाठविलेली यादी ही ऑनलाईन पोर्टलवर जुळत नसल्याने शासकीय धान खरेदीला प्रारंभ होण्यास विलंब होत आहे. मागील दोन दिवसांपासून ही तांत्रिक अडचण दूर करण्याचा  प्रयत्न केला जात आहे. पण ती अद्यापही दूर झाली नसल्याने धान खरेदी सुरू होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ धान खरेदी करते. यंदाच्या खरीप हंगामापासून धान खरेदी करण्यासाठी शासनाने मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे तेवढेच धान खरेदी करता येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना धानाची विक्री करायची आहे त्यांना शासनाच्या एनईएल या ऑनलाईन पाेर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ९५ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाेंदणी केली आहे.  सध्या खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणी आटोपली आहे. शेतकरी धान विक्री करण्यासाठी बाजारपेठेत आणत  आहेत. पण अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना अल्पदरात गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यापूर्वी आम्ही सर्व धान खरेदी केंद्रांना २ नोव्हेंबरला धान खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. पण ऑनलाईन पाेर्टलवरील धान खरेदीचे टार्गेट जुळत नसल्याने धान खरेदी सुरू करण्यास अडचण होत आहे. ही अडचण  पुन्हा चार-पाच दिवसात दूर होण्याची शक्यता कमी असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे धान खरेदी सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. 

चौकशी पुन्हा थंडबस्त्यात - धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची काही केंद्रांनी परस्पर विक्री केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर या केंद्राची चौकशी सुरू करण्यात आली. पण त्यानंतर या खरेदी केंद्राचे नेमके काय झाले, हे कळण्यास मार्ग नाही.

जेवढा विलंब तेवढा खासगी व्यापाऱ्यांचा फायदा यंदा दिवाळी आटोपली तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. त्यातच जेवढा उशीर शासकीय धान खरेदीला होईल, तेवढाच फायदा खासगी व्यापाऱ्यांचा होणार आहे. दरम्यान, या संधीचा ते फायदा घेत आहेत. 

हमीभाव २०४० रुपये, धान घेतले जातेय १६०० रुपये क्विंटल- शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी हमीभावाने धान खरेदी केली जाते. पण शासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या दिरंगाईमुळे अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना १६०० रुपये प्रति क्विंटल दराने धानाची विक्री करावी लागत आहे. क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. 

पुन्हा राजकीय नेत्यांच्या जवळच्यांना धान खरेदी केंद्र धान खरेदीचा घोळ गाजत असतानाच जिल्ह्यातील नवीन काही धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यात सर्वाधिक केंद्र ही राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांना देण्यात आली आहेत. हे धान खरेदी केंद्र मंजूर करताना नियमांना सुद्धा डावलण्यात आल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी