नवविवाहित पत्नीला अश्लील चित्रफित दाखवून पती करायचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2023 20:27 IST2023-06-23T20:26:41+5:302023-06-23T20:27:35+5:30

Gondia News लग्नानंतर पतीने अश्लील चित्रफित दाखवून केलेल्या अनैसर्गिक अत्याचाराच्या दहशतीपायी पत्नीने थेट पोलिसात धाव घेत दाद मागितली आहे. 

Husband abuses newly married wife by showing obscene videos; | नवविवाहित पत्नीला अश्लील चित्रफित दाखवून पती करायचा अत्याचार

नवविवाहित पत्नीला अश्लील चित्रफित दाखवून पती करायचा अत्याचार



गोंदिया: लग्नानंतर पतीने अश्लील चित्रफिती दाखवून केलेल्या अनैसर्गिक अत्याचाराच्या दहशतीपायी पत्नीने थेट पोलिसात धाव घेत दाद मागितली आहे. 

गोंदिया शहराच्या गांधी वॉर्डातील एका २३ वर्षाच्या नववधूने गोंदिया शहर पोलिस ठाण्यात २० जून रोजी केलेल्या तक्रारीनुसार तिचा पती आरोपी हा ३० वर्षाचा आहे. त्या दोघांचे लग्न रितीरिवाजाप्रमाणे २४ एप्रिल २०२३ ला झाले. परंतु लग्न झाल्यापासून आरोपी दारू पिऊन घरी आल्यावर तिला मारहाण करायचा. तिच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार करायचा. तिच्या विरोधात त्याची नागपूर येथील बहिणी भडकावित असल्याचाही आरोप तिने दिलेल्या तक्रारीतून केला आहे. आरोपी पती तिला मारहाण करायचा. पुढे ठार करण्याची धमकीही त्याने तिला दिली आहे. यापूर्वी तिला मारहाण झाल्याने तिने ही गोष्ट आपल्या माहेरच्या लोकांना सांगितल्यावर त्यांच्यात चर्चा झाली. त्याने त्या चर्चेत त्याने तिला त्रास देणार नाही अशी हमी मुद्रांकावर लिहून दिली होती. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी पतीवर भादंविच्या कलम ३७६ (२), (एन), ३७७, ३२५, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामभाऊ व्होंडे करीत आहेत.

अश्लील चित्रफित दाखवायचा
पत्नीला अश्लील चित्रफित दाखवून तिच्यावर तो अनैसर्गिक अत्याचार करायचा. या कृत्याला तिने विरोध दर्शविल्यावर तिला तो मारहाण करायचा. लग्नापासून सुरू असलेल्या या कृत्याला कंटाळून तिने पोलिसात तक्रार केली आहे. अश्लील चित्रफितमध्ये पाहिलेले क्षण तो प्रत्यक्षात कृती करण्याचा प्रयत्न करायचा असा आरोप त्याच्याविरूध्द केलेल्या तक्रारीत केला आहे.

निर्वस्त्र करून घराबाहेर काढले
आरोपी पतीने ६ जून रोजी त्याच्या कृत्याचा विरोध तिने केल्यावर आरोपीने तिला निर्वस्त्र करून घराबाहेर काढले होते. ती गोष्ट तिने आपल्या आईवडीलांना सांगितल्यावर त्याने माफी मागून यापुढे असे कृत्य करणार नसल्याची हमी मुद्रांकावर लिहून दिली आहे.

त्याची इच्छा पूर्ण न झाल्यास ॲसीड टाकण्याची धमकी
२० जून रोजी पहाटे ३ वाजता त्याने पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्याची इच्छा जाहीर केली. परंतु त्याच्या या कृत्याला तिने नकार दिले असता तिला मारहाण करून तू माझी इच्छा पूर्ण केली नाही तर तुझ्यावर ॲसीड टाकून ठार करील अशी धमकी दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. 
 

Web Title: Husband abuses newly married wife by showing obscene videos;