चक्रीवादळ गारपिटीचा चिचगड परिसराला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:20+5:30
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस गारपिटीसह चक्रीवादळाला सुरूवात झाली. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा येथील वनविभागाच्या वसाहतीला बसला झाली.वनक्षेत्राधिकारी निवासस्थान आणि वनरक्षकाचे निवासस्थानाचे संपूर्ण छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

चक्रीवादळ गारपिटीचा चिचगड परिसराला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचगड : देवरी तालुक्यातील चिचगड परिसरात मंगळवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीचा फटका या परिसरातील रब्बी पिके आणि घरांना मोठ्या प्रमाणात बसला. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे छत उडाले तर काही प्रमाणात घरांची पडझड सुध्दा झाली आहे. यामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस गारपिटीसह चक्रीवादळाला सुरूवात झाली. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा येथील वनविभागाच्या वसाहतीला बसला झाली.वनक्षेत्राधिकारी निवासस्थान आणि वनरक्षकाचे निवासस्थानाचे संपूर्ण छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. चक्रीवादळामुळे वनपरिक्षेत्राधिकारी शासकीय निवासस्थानचे छत पूर्ण उडाले व त्यावर निंबाचे झाड कोसळल्याने अधिक नुकसान झाले. वायरलेस टॉवर पडून कार्यालयाचे नुकसान झाले. चक्रीवादामुळे चिचगड येथील अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे गावकऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवस उजाडताच अनेक शेतकºयांनी आपल्या शेताकडे धाव नुकसानीची पाहणी केली. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस गारपीट आणि पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अर्जुनी मोर. तालुक्यातील तीन गावांचे नुकसान
मंगळवारी आलेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीचा फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामपुरी, एलोडी, जांभळी या गावांना बसला. या तिन्ही गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तलाठी आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हाधिकाºयांनी दिले सर्वेक्षणाचे नुकसान
देवरी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही गावांना मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली असून रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाºयांना दिले आहे.