जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार उघड्यावरच
By Admin | Updated: May 12, 2014 23:51 IST2014-05-12T23:51:15+5:302014-05-12T23:51:15+5:30
जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळूनसुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या

जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार उघड्यावरच
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळूनसुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या कोपर्यात उघड्यावर आपले ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे त्यांना वर्षभर ऊन-पावसाच्या तडाखा सहन करावा लागत असते. त्यांना मिळालेले लोखंडी स्टॉल कचर्यात धूळ खात पडलेले आहेत. त्यांना गंज लागल्यामुळे निकामी व नष्ठ होण्याच्या मार्गावर आहेत. ही परिस्थिती पाहून असे वाटते की गटई कामगारांना शासनाकडून मिळणारी मदत वाया जात असते. तर चर्मकारांची आर्थिक परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे. गटई कामगार उघड्यावर बसून जोडे चपला दुरूस्ती किंवा विक्री करीत असल्याचे मुख्य कारण असे की ज्या लोकांच्या घरासमोर किंवा जागे समोर ते आपले लोखंडी स्टॉल मांडू इच्छितात ते लोक त्या ठिकाणी जागा देत नाही. त्यांना असे वाटते की एक वेळा लोखंडी स्टॉल ठेवायला जागा दिली तर त्यावर ते कायमचा आपला हक्कम जमावतील व भविष्यात त्यांना हटविता येवू शकणार नाही. काही जागा मालक तर असे आहेत की, आपल्या जागेसमोर त्यांना उघड्यावरसुध्दा दुकान मांडू देत नाही. एवढेच नाहीतर आपल्या घरासमोर असलेल्या शासकीय जागेवर सुध्दा बसू देत नाही. त्यामुळे अनेकांना सोयीस्कर ठिकाणी दुकान मांडण्यासाठी मोठी पंचाईत होत असते. चपला-जोडे विकण्याचा व तयार करणाच्या व्यवसाय हा आता एका जणापुरता र्मयादीत राहीला नसून कोणीही या व्यवसायात विनियोग करून अर्थार्जन करू शकतो. त्याचप्रमाणे चर्मकार लोक चर्मकाम करण्याच्या पूर्ती स्वत:ला अकडवून न ठेवता वाटले तो व्यवसाय करून आपली आर्थिक परिस्थती भक्कम करू लागले आहेत. पिढय़ानपिढय़ांपासून अनेक कुटुंबे हाच व्यवसाय करीत असल्याचे दिसतात. शासन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करीत आहे. समाज ग्रामीण भागात सामाजिक प्रवाहापासून वेगळाच राहतो. इतर समाजीत लोक त्यांना आपल्या कोणत्याही काम काजात सम्मलीत करीत नाही किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाही. त्यामुळे गावातील सामाजिक ऐक्य निर्माण होण्यास अडचण निर्माण होत असते. चर्म कामगारांना या अनुसूचित जातीमध्ये समावेश असून त्यांच्यावर जातीय अत्याचार झाल्यास अँट्रासिटी कायद्याअंतर्गत आपला संरक्षण करून सन्मानाने जगू शकतात. परंतू या समाजाचे लोक मृदू स्वाभावाचे व समाजातील इतर लोकांशी नमते घेवून जीवन यापन करीत असल्याने त्यांना कोणी दुकान लावायला जागा दिली नाही दिली. (तालुका प्रतिनिधी)