जिल्हावासीयांना थोडा दिलासा मात्र चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:25+5:30

गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यापैकी ३ रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असून एक रुग्ण गोरेगाव शहरातील, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा ५६ वर पोहचला. पण गुरूवारीच यापैकी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक आणि आमगाव तालुक्यातील एक असे एकूण दोन कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाले.

However, the residents of the district were relieved | जिल्हावासीयांना थोडा दिलासा मात्र चिंता कायम

जिल्हावासीयांना थोडा दिलासा मात्र चिंता कायम

Next
ठळक मुद्देदिवसभरात सहा कोरोना बाधीत रुग्णांची भर : दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चित्र आहे. गुरूवारी (दि.२८) जिल्ह्यात पुन्हा सहा नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ५६ वर पोहचला. मात्र यापैकी दोन कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला. पण दुसरीकडे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता कायम आहे.
गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात सहा नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यापैकी ३ रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असून एक रुग्ण गोरेगाव शहरातील, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा ५६ वर पोहचला. पण गुरूवारीच यापैकी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एक आणि आमगाव तालुक्यातील एक असे एकूण दोन कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण ५४ अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधीत रुग्ण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना बाधीत रुग्णांना आता १० दिवस आयसोलेशन कक्षात ठेवले जात आहे.
यानंतर त्यांना कसलीच लक्षणे न दिसल्यास कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करुन रुग्णालयातून सुटी दिली जात आहे. याच नवीन नियमानुसार गुरूवारी जिल्ह्यातील दोन कोरोना बाधीत रुग्णांना कोरोनामुक्त घोषीत करुन रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. ही बाब जरी दिलासादायक असली तरी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंता मात्र कायम आहे. कोरोना बाधीत आढळलेले रुग्ण हे प्रामुख्याने पुणे आणि मुंबई येथूनच आलेले आहे.

६३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अप्राप्त
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ९३४ लोकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ५६ नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ८०० नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ६३ नमुन्यांचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. १५ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ४५९ रुग्णांवर उप चार सुरू असून शासकीय क्वारंटाईन कक्षात ९४ जण दाखल आहेत. गुरूवारी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मात्र त्यांना सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. सुटी देताना या दोन्ही रुग्णाचे समुपदेशन करण्यात आले.

अर्जुनी मोर. तालुका कोरोनाचा हाटस्पॉट
जिल्ह्यात सर्वाधिक ३१ कोरोना बाधीत रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. गुरूवारी याच तालुक्यात नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुका कोरोनाचा हाटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. तर हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून ते मुंबई, पुणे येथे रोजगारासाठी गेले होते.त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: However, the residents of the district were relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.