मुख्यालयी न राहता कर्मचारी घेतात घरभाडे
By Admin | Updated: June 4, 2014 23:52 IST2014-06-04T23:52:55+5:302014-06-04T23:52:55+5:30
तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक शासकीय निम्मशासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात नोकरी करतात. खोटे दस्ताऐवज सादर करून घरभाडे उचलतात.

मुख्यालयी न राहता कर्मचारी घेतात घरभाडे
रावणवाडी : तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक शासकीय निम्मशासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात नोकरी करतात. खोटे दस्ताऐवज सादर करून घरभाडे उचलतात. ग्रामीण भागातील कर्मचारी घरभाडे खिशात घालून शासन व जनतेची फसवणूक करतात.
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा अनुशासन नियम १९६७ च्या नियम ३ नुसार कर्मचार्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असले तरी शासकीय निमशासकीय कार्यालयात या नियमाचे पालन होताना दिसत नाही. परंतु अधिकारी कर्मचारी शासनाची दिशाभूल करून घर भाड्याची उचल मात्र प्रत्येक महिन्याला होत आहे. शासनाकडून असे नियम का म्हणून ठरविण्यात आले. असा प्रश्न जनसामान्य नागरिकाकडून होत आहे. कर्मचारी अधिकारी स्वयंमर्जीने आपल्या सुख सुविधेसाठी अपडाऊन करीत आहेत. तर त्या कर्मचार्यांना घरभाडे कशासाठी देण्यात येत आहे. हे जानून घेण्याची तीव्र इच्छा ग्रामीण नागरिक प्रकट करीत आहेत.
ग्रामीण भागात नियुक्त कर्मचार्यांना मुख्यालयी राहून जनतेची सेवा बंधनकारक असताना असंख्य कर्मचारी या नियमाना हरताळ फासतात. ग्रामीण जनतेला यामुळे शासनाच्या विविध सेवा योजनापासून वंचीत राहावे लागते. अपडाऊनमुळे शाळेत विद्यार्थ्यांंना योग्य शिक्षण मिळत नाही म्हणून विद्यार्थी खासगी शाळेची रस्ता धरीत आहेत. वृक्षाची अवैध कत्तल होत आहे. मात्र त्यावर अंकुश लावणारा कुणीच समोर घेत नाही. सर्व सामान्य नागरिकासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्रे उभारली आहेत. त्यात कर्मचार्यासाठी निवासस्थानाची सुविधा केली. मात्र नागरिकाना आरोग्याच्या प्रश्नासाठी जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.