शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणींसमोर घर खर्चाचा प्रश्न, महागाईने कोलमडले सर्वांचेच बजेट

By admin | Updated: August 12, 2014 23:50 IST

सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

रावणवाडी : सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोल वरील नियंत्रण सैल केले आहे. त्यामुळे वर्षभरापासून पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. या दरवाढीचा सर्वच बाबींवर परिणाम होऊन महागाई सतत वाढत चालली आहे. दैनंदिन उपयोगात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर ही वाढतच आहेत. सोबतच बांधकाम साहित्याचे भाव ही गगणाला भिडले आहेत. त्याप्रमाणे विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या कामगारांच्या मजूरीत वाढ होताना दिसत नाही. सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेटच बिघडून टाकले आहे. मानवी जीवनात जीवनावश्यक असलेल्या वस्तंूचे दर दिवशी दर वाढतच आहेत. त्याचा सर्वाधीक परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.दिवसें-दिवस वाढत्या महागाईने सर्व सामान्य गृहिणींचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे या महागाईने जगणेच कठीण झाले आहे. कष्टकरी शेतकरी शेतमजूरांची कांदा-भाकरीही या महागाईने जेवणात वापरणे कठीण झाले आहे. सध्या कांद्याचे भाव ३० ते ३५ रुपये किलो असल्याने यावेळी कांदाही डोळ्यात अश्रू आणत आहे. दैनंदिन बहू उपयोगासाठी वापरण्यात येणारे भाजीपाल्याचे भावही गगणाला भिडले आहे. सध्या भाजी बाजारात ६० ते ८० रुपये प्रती किलो दरात भाजीपाला विक्री केला जात आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदी करणे ही अशक्य झाले आहे. वाढत्या महागाईने दैनंदिन गरजा कशा भागवायच्या व संसाराचा गाडा कसा चालवावा असे विविध प्रश्न नागरिकांपुढे उपस्थित होत आहे. शासनाने यावर उपाय योजना करावी असे सर्व सामान्य नागरिकांचे बोलने आहे.