गृहिणींसमोर घर खर्चाचा प्रश्न, महागाईने कोलमडले सर्वांचेच बजेट

By Admin | Updated: August 12, 2014 23:50 IST2014-08-12T23:50:51+5:302014-08-12T23:50:51+5:30

सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

Before the house-owners, the question of home cost, the budget of everyone who collapsed | गृहिणींसमोर घर खर्चाचा प्रश्न, महागाईने कोलमडले सर्वांचेच बजेट

गृहिणींसमोर घर खर्चाचा प्रश्न, महागाईने कोलमडले सर्वांचेच बजेट

रावणवाडी : सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोल वरील नियंत्रण सैल केले आहे. त्यामुळे वर्षभरापासून पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. या दरवाढीचा सर्वच बाबींवर परिणाम होऊन महागाई सतत वाढत चालली आहे. दैनंदिन उपयोगात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर ही वाढतच आहेत. सोबतच बांधकाम साहित्याचे भाव ही गगणाला भिडले आहेत. त्याप्रमाणे विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या कामगारांच्या मजूरीत वाढ होताना दिसत नाही. सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेटच बिघडून टाकले आहे. मानवी जीवनात जीवनावश्यक असलेल्या वस्तंूचे दर दिवशी दर वाढतच आहेत. त्याचा सर्वाधीक परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.
दिवसें-दिवस वाढत्या महागाईने सर्व सामान्य गृहिणींचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे या महागाईने जगणेच कठीण झाले आहे. कष्टकरी शेतकरी शेतमजूरांची कांदा-भाकरीही या महागाईने जेवणात वापरणे कठीण झाले आहे. सध्या कांद्याचे भाव ३० ते ३५ रुपये किलो असल्याने यावेळी कांदाही डोळ्यात अश्रू आणत आहे. दैनंदिन बहू उपयोगासाठी वापरण्यात येणारे भाजीपाल्याचे भावही गगणाला भिडले आहे. सध्या भाजी बाजारात ६० ते ८० रुपये प्रती किलो दरात भाजीपाला विक्री केला जात आहे.
त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदी करणे ही अशक्य झाले आहे. वाढत्या महागाईने दैनंदिन गरजा कशा भागवायच्या व संसाराचा गाडा कसा चालवावा असे विविध प्रश्न नागरिकांपुढे उपस्थित होत आहे. शासनाने यावर उपाय योजना करावी असे सर्व सामान्य नागरिकांचे बोलने आहे.

Web Title: Before the house-owners, the question of home cost, the budget of everyone who collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.