आऊटरवर तासन् तास थांबतात रेल्वेगाड्या

By Admin | Updated: February 12, 2016 02:11 IST2016-02-12T02:11:06+5:302016-02-12T02:11:06+5:30

गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभ्या ठेवल्या जातात. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो.

Hours stop at the outlet | आऊटरवर तासन् तास थांबतात रेल्वेगाड्या

आऊटरवर तासन् तास थांबतात रेल्वेगाड्या

उपाययोजना थंड : प्रवाशांच्या समस्यांमध्ये होतेये सतत वाढ
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभ्या ठेवल्या जातात. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो. परंतु अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी प्रवाशांचा रोषाचा स्फोट रेल्वे अधिकाऱ्यांवर होवू शकतो.
गोंदिया ते बालाघाट व बालाघाट ते गोंदिया ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या बाबत अशा घटना नेहमीच घडत असतात. बालाघाट ते गोंदिया डेमूचा वेळ गोंदियावरून ६.४५ वाजता सुटण्याचा आहे. तर गोंदियाला पोहोचण्याचा वेळ सकाळी ७.५५ वाजता आहे. ही गाडी वसंतनगरजवळ दरदिवशी ३० ते ५० मिनिटांपर्यंत उभी ठेवली जाते. त्यामुळे प्रवाशांना दुसरी गाडी पकडण्यासाठी मोठाच त्रास होतो.
बालाघाटवरून लोक इतर रेल्वेगाड्या पकडण्यासाठी गोंदियाला येतात. परंतु आऊटरवर गाड्या थांबविण्यात येत असल्याने दुसऱ्या गाड्या सुटतात व प्रवाशांना अकारण तासनतास गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबून रहावे लागते. मागील तीन-चार दिवसांपासून प्रवाशांच्या वतीने रेल्वे स्थानकात पोहोचून स्थानक व्यवस्थापकांचे लक्ष वेधले जात आहे.
परंतु आतापर्यंत ही समस्या सोडविण्याच्या दिशेत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. ही बाब केवळ डेमू गाडीबाबतच नव्हे तर मेमू गाड्यांबाबतही हीच समस्या कायम आहे.
इतवारी ते गोंदिया व दुर्ग ते गोंदिया येणाऱ्या गाड्यासुद्धा अशाचप्रकारे आऊटरवर थांबविल्या जातात. इतवारीवरून येणाऱ्या गाड्यांना तर गोंदियाजवळ दोन ठिकाणी थांबविले जाते. एक एमआयडीसीजवळ व त्यानंतर सूर्याटोलाजवळ. दोन्ही ठिकाणांवर एक तासापेक्षा अधिक वेळ प्रवाशांचा अकारणच जातो. दुर्गवरून येणाऱ्या गाड्यांना सिव्हील लाईनजवळ प्रोग्रेसिव्ह शाळेजवळ उभ्या केल्या जातात.
रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केल्यावर सांगण्यात येते की, गोंदियात पर्याप्त प्लॅटफॉर्म नसल्यामुळे अशी स्थिती निर्मित होत आहे. जेव्हा या गाड्या पोहोचतात तेव्हा प्लॅटफॉर्म उपलब्ध राहत नाही. त्यामुळे सदर गाड्यांना आऊटरवर थांबविले जाते.
या संदर्भात गोंदिया रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक रविनारायण कार यांनी सांगितले की, ही समस्या गोंदिया स्थानकाशीच निगडीत नाही, तर ज्या प्रकारची व्यवस्था बनविण्यात आली आहे, त्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे.
वरील आदेशाने सदर समस्या सोडविण्याचेही त्यांनी सांगितले. मात्र वरिष्ठ स्तरावरही सदर समस्या सोडविण्याच्या दिशेने काहीही प्रयत्न करण्यात आले नाहीत.(प्रतिनिधी)

Web Title: Hours stop at the outlet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.