जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांमुळे वाढतेय एचआयव्ही

By Admin | Updated: May 13, 2014 23:41 IST2014-05-13T23:41:03+5:302014-05-13T23:41:03+5:30

मृत्यूच्या दारात उभा असलेल्या माणसाला संजीवनी देण्याचे काम डॉक्टर करतात. मात्र डॉक्टरी पेशाला काळिमा फासत चक्क नागरिकांची दिशाभूल करणारे बोगस डॉक्टर ग्रामीणांकडून

HIV infected with bogus doctors in district | जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांमुळे वाढतेय एचआयव्ही

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांमुळे वाढतेय एचआयव्ही

गोंदिया : मृत्यूच्या दारात उभा असलेल्या माणसाला संजीवनी देण्याचे काम डॉक्टर करतात. मात्र डॉक्टरी पेशाला काळिमा फासत चक्क नागरिकांची दिशाभूल करणारे बोगस डॉक्टर ग्रामीणांकडून मोठय़ा प्रमाणात पैसे उकळून रुग्णांना एचआयव्हीरुपी मृत्यू देत आहेत. दररोज ग्रामीण रुग्णांच्या खिशातून लाखो रुपये उकळणारे २00 पेक्षा अधिक बोगस डॉक्टर जिल्ह्यात आहेत.

एचआयव्हीच्या प्रसारामुळे सरकारतर्फे महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार देऊन एचआयव्ही बाधितांचे समुपदेशन करण्यासाठी ठेवले. एचआयव्ही बाधिताला समाजात अपमानाची वागणूक मिळू नये यासाठी वेळेवेळी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. शासनातर्फे कोट्यवधी रुपये या एचआयव्हीवर नियंत्रणासाठी खर्च केले जातात. मात्र ग्रामीण भागात असलेले डॉक्टर पैसा कमविण्याच्या लालसेपायी ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याचे धिंडवडे काढीत आहेत.

२५ रुपयांत इंजेक्शन लावणारे बोगस डॉक्टर आताही एकाच सुईने चार-पाच रुग्णांना इंजेक्शन लावत असतात. दुखणे असल्यास पेनकिलर देणे हा त्यांचा नेहमीचा प्रकार अनेक रुग्णांच्या जिवावर बेतला आहे. अनेक बोगस डॉक्टर आजही गरम करुन तीच सुई अनेक रुग्णांना लावत आहेत. आमगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या तालुक्यात एमसीव्हीसी केलेला एक तरूण चक्क आपण डॉक्टर आहोत, अशी बतावणी करून वाताचे इंजेक्शन लावत आहे. एमसीव्हीसी केलेल्या तरूणाचा डॉक्टरकी व्यवसायाशी दूरदूरपर्यंंंत सबंध नाही. तरीदेखील तो आपला बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय खुशालपणे चालवीत आहे.

एका बॅगमध्ये टेटस्कोप, इंजेक्शन, औषधी व इतर साहित्य घेऊन गावोगावी फिरणारे हे बोगस डॉक्टर दिवसाकाठी ५00 ते ७00 रुपये कमवीत आहेत. ज्यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा डिप्लोमा घेतला तेही आपण डॉक्टर असल्याची सांगून पैसा कमवीत आहेत. ग्रामीणांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. एकाच व्यक्तीला लावलेले इंजेक्शन अनेकांना लावत असल्याने यातून एचआयव्हीची लागण होत आहे.

जिल्ह्यात मोठय़ा संख्येने बोगस डॉक्टर आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांनी आज एखाद्याला पकडले की जामीन घेतल्यानंतर तो पुन्हा आपला व्यवसाय जोमाने चालवीत असतो. वैद्यकीय क्षेत्रातून पदवी प्राप्त डॉक्टर रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेत त्याच्या शरीरावर परिणाम होणार नाही याची निगा राखतो. परंतु बोगस डॉक्टर आपल्याला रुग्णाने नेहमी बोलवावे यासाठी तत्काळ आराम करणारे हायपॉवरचे डोस रुग्णांना देत असतात.

गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात बोगस, डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. सालेकसा, देवरी, सडक/अर्जुनी, तिरोडा, आमगाव, अर्जुनी/मोरगाव, गोरेगाव व गोंदिया तालुक्यात बोगस डॉक्टरांची प्रॅक्टीस जोमाने सुरू आहे. परंतु या बोगस डॉक्टरांवर पोलिसांकडून किंवा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली नाही.

सद्यस्थितीत वातरोगाचे प्रमाण मोठे असल्याने वातरोगाची औषध देण्याच्या नावावर हजारो रुपये दररोज एक-एक बोगस डॉक्टर उकळत आहे. या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर हे बोगस डॉक्टरांना अभयदेत असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंंंत एकही बोगस डॉक्टर पकडण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: HIV infected with bogus doctors in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.