शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील दुर्गम भागातून हेमकृष्णने गाठले यूपीएससीचे शिखर; कामाचा मोठी जबाबदारी सांभाळत मिळविले यश

By अंकुश गुंडावार | Updated: March 7, 2026 14:37 IST

धामणगाव येथे नायब तहसीलदारपदी कार्यरत : प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मिळविली ८३९ रँक

गोंदिया : ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याचे फळ निश्चित मिळते. तब्बल चारवेळा एमपीएससी परीक्षा सर केल्यानंतर त्यावर समाधानी राहता यूपीएससी परीक्षा सर करायची असाच चंग बांधून त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवून त्यात देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचेवाडा येथील हेमकृष्ण पिसदे या युवकाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करीत गावाचे व गोंदिया जिल्ह्याचे नाव गौरवान्वित केले आहे.

शुक्रवारी (दि. ६) सन २०२५ बॅचच्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. यात देवरी तालुक्यातील चिचेवाडा येथील हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे या आदिवासी युवकाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करीत ८३९ वी रँक प्राप्त करीत आपली स्वप्नपूर्ती केली. हेमकृष्ण याचा जन्म देवरी तालुक्यातील चिचेवाडा या अतिदुर्गम आदिवासी गावात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण हे देवरी येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातून झाले. त्याने बीएची पदवी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केली. तर एमएची पदवी सावित्रीबाई फुले महाविद्यालयातून पूर्ण केली. हेमकृष्णने चारवेळा महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्या. मात्र, त्याचे ध्येय हे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे होते. चारवेळा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याने अनेक चांगल्या विभागात त्याला नोकरीची संधी मिळाली; पण त्याला त्यात रुची नव्हती. त्यामुळे तो यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होता.

वडिलांच्या आग्रहानंतर स्वीकारली नोकरी

मुलगा एकही नोकरी स्वीकारीत नसल्याचे पाहून वडील प्रेमलाल पिसदे यांनी त्याला नोकरी स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने मुंबई येथे पहिल्यांदा कामगार अधिकारी म्हणून नोकरीला सुरुवात केली; पण यावर संतुष्ट न राहता तो स्पर्धा परीक्षा देत राहिला. २०२५ मध्ये त्याची तहसीलदारपदी निवड झाल्याने अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली.

कामाचा व्याप सांभाळत मिळविले यश 

सध्या हेमकृष्ण पिसदे हे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. तिथे कार्यरत असतानासुद्धा त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. शुक्रवारी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये हेमकृष्णने संपूर्ण देशातून ८३९ रँक मिळवून यश संपादन केले. हेमकृष्णच्या या यशाने केवळ चिचेवाडा नव्हे तर गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला आहे.

"माझ्या यशाचे श्रेय माझ्या पालकांना आणि शिक्षकांना जाते. दुर्गम भागात राहत असूनही मोठ्या जिद्दीने अभ्यास केला तर यश नक्की मिळते, हा विश्वास आज सार्थ ठरला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वास बाळगून प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळते."- हेमकृष्ण पिसदे  

English
हिंदी सारांश
Web Title : Gondia youth Hemkrishna cracks UPSC, balancing job with success.

Web Summary : Hemkrishna Pisde from Gondia's remote area cleared UPSC with 839th rank. Despite working as a Tahsildar in Amravati, he pursued his dream, crediting his parents and teachers for his success.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीEducationशिक्षण