शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

त्या वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी टॉस्क फोर्सची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाने बळी घेतल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वाघाने गोरेगाव तालुक्यातील एका इसमाचा बळी घेतला होता. परिसरातील पशुपालकांच्या जनावरांवर सुध्दा या वाघाने ताव मारला. त्यामुळे पशुपालकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवसात घेतला दोघांचा बळी : गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून एका वाघाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या वाघाने आत्तापर्यंत दोन जणांचा बळी घेतल्याने दोन्ही तालुक्यातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी आता वन्यजीव विभाग स्पेशल टॉस्क फोर्सची मदत घेणार असल्याची माहिती आहे.तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाने बळी घेतल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वाघाने गोरेगाव तालुक्यातील एका इसमाचा बळी घेतला होता. परिसरातील पशुपालकांच्या जनावरांवर सुध्दा या वाघाने ताव मारला. त्यामुळे पशुपालकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण आहे. या पट्टेदार वाघाचा वावर दोन तालुक्यांच्या परिसरात असून अनेक गावकऱ्यांना त्याचे दर्शन सुध्दा झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या वाघाचा बंदोबस्त लावण्याची मागणी वन व वन्यजीव विभागाकडे केली आहे.मात्र वन्यजीव विभागाकडून वाघाचा बंदोबस्त लावण्यास दिंरगाई केली जात असल्याने गावकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गावकºयांचा वाढता रोष पाहता आता वन्यजीव विभागाने या वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. व्याघ्र प्रकल्पातंर्गत ही सेवा बरेचदा घेतली जात असल्याची माहिती आहे. या फोर्समध्ये १३ कर्मचाºयांचा एक ग्रुप असतो जो वन्यजीव विभागाला सहकार्य करीत असतो.नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी आठ टिमगोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन ठार झाल्यानंतर वन्यजीव विभागाने नागरिकांना जंगलात जाण्यास रोखण्यासाठी ८ टिम तयार केले होते. या टिममधील सदस्यांचे काम लोकांना जंगलात जाण्यापासून रोखणे आणि त्यांच्यामध्ये वन्यप्राण्यांबद्दल जनजागृती करण्याचे आहे.टोपोग्राफरचा अभावमागील पंधरा दिवसात वाघाने दोन जणांचा बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर वाघाचा बंदोबस्त लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र सध्या वन्यजीव विभागाकडे टोपोग्राफर नसल्याची माहिती आहे. वाघाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी व त्याच्या पायाच्या ठशांवरुन नकाशा तयार करण्याचे काम हे टोफोग्राफर करीत असतो. मात्र सध्या ही व्यवस्था वन्यजीव विभागाकडे नसल्याची माहिती आहे. याला तिरोडा वन विभागाच्या अधिकाºयांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.

टॅग्स :forestजंगल