त्या वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी टॉस्क फोर्सची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:22+5:30
तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाने बळी घेतल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वाघाने गोरेगाव तालुक्यातील एका इसमाचा बळी घेतला होता. परिसरातील पशुपालकांच्या जनावरांवर सुध्दा या वाघाने ताव मारला. त्यामुळे पशुपालकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण आहे.

त्या वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी टॉस्क फोर्सची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून एका वाघाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या वाघाने आत्तापर्यंत दोन जणांचा बळी घेतल्याने दोन्ही तालुक्यातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी आता वन्यजीव विभाग स्पेशल टॉस्क फोर्सची मदत घेणार असल्याची माहिती आहे.
तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाने बळी घेतल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वाघाने गोरेगाव तालुक्यातील एका इसमाचा बळी घेतला होता. परिसरातील पशुपालकांच्या जनावरांवर सुध्दा या वाघाने ताव मारला. त्यामुळे पशुपालकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण आहे. या पट्टेदार वाघाचा वावर दोन तालुक्यांच्या परिसरात असून अनेक गावकऱ्यांना त्याचे दर्शन सुध्दा झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या वाघाचा बंदोबस्त लावण्याची मागणी वन व वन्यजीव विभागाकडे केली आहे.
मात्र वन्यजीव विभागाकडून वाघाचा बंदोबस्त लावण्यास दिंरगाई केली जात असल्याने गावकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गावकºयांचा वाढता रोष पाहता आता वन्यजीव विभागाने या वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. व्याघ्र प्रकल्पातंर्गत ही सेवा बरेचदा घेतली जात असल्याची माहिती आहे. या फोर्समध्ये १३ कर्मचाºयांचा एक ग्रुप असतो जो वन्यजीव विभागाला सहकार्य करीत असतो.
नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी आठ टिम
गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन ठार झाल्यानंतर वन्यजीव विभागाने नागरिकांना जंगलात जाण्यास रोखण्यासाठी ८ टिम तयार केले होते. या टिममधील सदस्यांचे काम लोकांना जंगलात जाण्यापासून रोखणे आणि त्यांच्यामध्ये वन्यप्राण्यांबद्दल जनजागृती करण्याचे आहे.
टोपोग्राफरचा अभाव
मागील पंधरा दिवसात वाघाने दोन जणांचा बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर वाघाचा बंदोबस्त लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र सध्या वन्यजीव विभागाकडे टोपोग्राफर नसल्याची माहिती आहे. वाघाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी व त्याच्या पायाच्या ठशांवरुन नकाशा तयार करण्याचे काम हे टोफोग्राफर करीत असतो. मात्र सध्या ही व्यवस्था वन्यजीव विभागाकडे नसल्याची माहिती आहे. याला तिरोडा वन विभागाच्या अधिकाºयांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.