मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

By Admin | Updated: November 11, 2016 01:32 IST2016-11-11T01:32:51+5:302016-11-11T01:32:51+5:30

प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या नाम फाऊंडेशनकडून राज्यातील अनेक पिडीत कुटुंबांना मदत देण्यात आली.

Help hand in drought affected Marathwada | मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

शिक्षक कर्मचाऱ्यांना पुढाकार : नाम फाऊंडेशनला दिला ४२ हजारांचा धनादेश
गोंदिया : प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या नाम फाऊंडेशनकडून राज्यातील अनेक पिडीत कुटुंबांना मदत देण्यात आली. अत्यल्प पाऊस व सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या बोजाने वाकून गेलेल्या शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळत आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने गोंदियातील काही शिक्षक-कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी गोळा केलेल्या ४२ हजारांचा मदतीचा धनादेश बुधवारी (दि.९) नाम फाऊंडेशनच्या स्वाधीन करण्यात आला.
कमी वयात वैधत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना सामाजिक आधार व जगण्याचे सामर्थ्य देण्यासाठी नामने पुढाकार घेतला. यापासून प्रेरणा घेऊन व सामाजिक जाणीवेतून बीड, मराठवाड्याचे भूमिपूत्र असणारे व गोंदियात शिक्षण, आरोग्य, महसूल, पोलीस आणि वनविभागात सेवा देणारे कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले होते. या चळवळीतून गोंदियावासी असलेल्या मराठवाड्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले. सर्वांनी एकत्रिपणे यथाशक्ती ४२ हजार रुपये जमा केले.
९ नोव्हेंबर २०१६ ला माजलगाव येथे नाम फाऊंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके यांच्या निवासस्थानी ४२ हजार रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. यावेळी लक्ष्मण आंधळे, अशोक चेपटे, भीमराव आंधळे, अनंत शिंदे, माणिक राठोड, बंडू राठोड, धनंजय वाघ उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या आदिवासी व नक्षलप्रभावित गोंदियातील या कर्मचाऱ्यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या कामासाठी लक्ष्मण आंधळे, किशोर गर्जे, अशोक चेपटे, सदाशिव पाटील, चेतन उईके, युवराज बडे, युवराज माने, शिवाजी बडे, नारायण शिरसाट, चंद्रशेखर हेमके, परमेश्वर चिरले यांनी पुढाकार घेतला.
याशिवाय गोंदियाचे नुतन बांगरे, फौजदार दराडे, ठाणेदार केंद्रे, प्रकाश घुगे, गोडबोेले, तिपोळे, कानगुले, तेजनकर, खेडकर, झाडे, राठोड, जाधव यांनीही सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Help hand in drought affected Marathwada