अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३६ शाळा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:13+5:30
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच कहर केला. सन २००५ मध्ये आलेल्या पुरालाही यंदाच्या पुराच्या मागे टाकले. या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय कित्येकांची घरे, गोठे पडली. या पुराने जिल्ह्यातील ८ तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळांनाही सोडले नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या एक हजार ३९ आहे. परंतु पुरामुळे यापैकी ३६ शाळा जमीनदोस्त झाल्या आहेत.

अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३६ शाळा उद्ध्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदाच्या पावासाळ्यात जून व जुलै या महिन्यांत पावसाने दडी मारली. परंतु ऑगस्ट महिन्यात सुरूवातीपासून अखरेपर्यंत आलेल्या दमदार पावासाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुराने जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ३६ शाळांना उद्ध्वस्त केले. यात १.१६ कोटी रूपयांचे नुकसान झाले असून तालुक्यातील सर्वाधिक २० शाळांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच कहर केला. सन २००५ मध्ये आलेल्या पुरालाही यंदाच्या पुराच्या मागे टाकले. या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय कित्येकांची घरे, गोठे पडली. या पुराने जिल्ह्यातील ८ तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळांनाही सोडले नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या एक हजार ३९ आहे. परंतु पुरामुळे यापैकी ३६ शाळा जमीनदोस्त झाल्या आहेत. यात, आमगाव तालुक्यातील ५ शाळा, गोंदिया तालुक्यातील २० शाळा तर तिरोडा तालुक्यातील ११ शाळा अशा एकूण ३६ शाळांचा समावेश आहे. त्या सर्व शाळांचे पंचनामे करण्यात आले आहे. अर्जुनी-मोरगाव, देवरी, सालेकसा, गोरेगाव व सडक-अर्जुनी या ५ तालुक्यांत पुराची भिषणता तेवढी नव्हती. त्यामुळे शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकले नाही. मात्र गोंदिया, तिरोडा व आमगाव या ३ तालुक्यांतील नदीच्या काठावर असलेल्या गावांतील शाळांचे नुकसान झाले आहे. आमगाव तालुक्यातील ५ शाळांना बाघनदीच्या पुरामुळे धोका निर्माण झाला होता. गोंदिया तालुक्यातील २० शाळा बाघनदी व वैनगंगा नदीच्या पुरामुळे ध्वस्त झाल्या. तर तिरोडा तालुक्यातील ११ शाळा वैनगंगेच्या पुराने पडल्या.
गोंदिया तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव व तिरोडा या ३ तालुक्यांतील ३६ शाळांचे नुकसान झाले ते एक कोटी १६ लाखांच्या घरात आहे. यामध्ये, आमगाव तालुक्यातील ५ शाळांचे १६ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गोंदिया तालुक्यातील २० शाळांचे ६४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तर तिरोडा तालुक्यातील ११ शाळांचे ३६ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.