आमगाव, सालेकसा तालुक्यात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:20+5:30

जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री न करता आल्याने आधीच शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शुक्रवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे नुकसान सहन करावे लागले. आमगाव येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

Heavy rains in Amgaon, Saleksa taluka | आमगाव, सालेकसा तालुक्यात वादळी पाऊस

आमगाव, सालेकसा तालुक्यात वादळी पाऊस

ठळक मुद्देरस्त्यावर साचले पाणी : पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : हवामान विभागाने जिल्ह्यात शुक्रवारपासून पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गोंदियासह तर आमगाव आणि सालेकसा तालुक्यात शुक्रवारी (दि.८) दुपारी चार वाजताच्या सुमारास वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास २० ते २५ मिनिटे पाऊस झाल्याने आमगाव येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री न करता आल्याने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच शुक्रवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे नुकसान सहन करावे लागले. आमगाव येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
वादळी वाऱ्यासह पावसाने अचानक हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. जवळपास २० ते २५ मिनिटे पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर सालेकसा तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. हवामान विभागाने पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Heavy rains in Amgaon, Saleksa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस