अतिसार पंधरवड्याकडे आरोग्य विभागाची पाठ

By Admin | Updated: August 6, 2014 23:54 IST2014-08-06T23:54:20+5:302014-08-06T23:54:20+5:30

शासनाने २८ जुलै ते ८ आॅगस्ट अतिसार पंधरवाडा म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. परंतु महाराष्ट्रात ओआरएस व झिंक चा पुरवठा न केल्याने अतिसार पंधरवाड्याचे बारा वाजले.

The health department's text to diarrhea fortnightly | अतिसार पंधरवड्याकडे आरोग्य विभागाची पाठ

अतिसार पंधरवड्याकडे आरोग्य विभागाची पाठ

ओआरएसचे वाटप नाही : केंद्राचे अधिकारी दाखल
गोंदिया : शासनाने २८ जुलै ते ८ आॅगस्ट अतिसार पंधरवाडा म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. परंतु महाराष्ट्रात ओआरएस व झिंक चा पुरवठा न केल्याने अतिसार पंधरवाड्याचे बारा वाजले. परिणामी दिल्ली मंत्रालयातील दोन सदस्य गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
केंद्र शासनाने २८ जुलै ते ८ आॅगस्ट हा पंधरवाडा अतिसार पंधरवाडा राबवायचा होता. या पंधरवाड्यात ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना डायरिया होऊ नये यासाठी ओआरएस व झिंक वाटप करायचे होते. पाच- पाच दिवसाचे दोन आठवडे गृहीत धरून शासनाने २८ जुलै ते ८ आॅगस्ट दरम्यान हा पंधरवाडा राबवायचा होता. परंतु महाराष्ट्रातील संपुर्ण जिल्ह्यात या पंधरवाड्यासाठी लागणारे ओआरएस व झिंक चा पुरवठा न केल्यामुळे ह्या पंधरवाड्यात ओआरएस व झिंकचा वाटप जिल्ह्यात झाले नाही. गोंदिया जिल्ह्यात ० ते ५ वर्ष वयोगटातील ८५ हजार बालके गोंदिया जिल्ह्यात आहेत. पहिल्या आठवड्यात डायरीयावर नियंत्रण व दुसऱ्या आठवड्यात बालकांना विविध आजार असल्याची शोध मोहीम राबवायचे होते. परंतु महाराष्ट्र सरकारने या काळात ओआरएस व झिंक न पुरविल्यामुळे राज्यात हा पंधरवाडा राबविण्यास अडसर झाला. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्यातील ओआरएस बालकांपर्यंत पोहचविले. परंतु बहुतांश बालकांना ओआरएस देण्यात आले नाही.
यासाठी भारत सरकारच्या दिल्ली येथील आरोग्य मंत्रालयातील महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. अजय पटले व युनिसेफचे प्रकल्प अधिकारी चिकनकर हे दोन दिवसासाठी गोंदियात बुधवारी दाखल झाले आहेत. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर यांच्यांशी चर्चा करून आमगाव व गोरेगाव या दोन तालुक्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पंधरवाड्यात महाराष्ट्र शासनाने ओआरएस व झिंक पुरवठा न केल्यामुळे या मोहमेचा कालावधी ३१ आॅगस्ट पर्यंत केल्याची माहिती डॉ.अजय पटले यांनी दिली. केंद्रशासनाने देशात एकाच सोबत ही मोहीम चालविण्याचे निर्देश दिले परंतु महाराष्ट्रात याकडे दुर्लक्ष करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The health department's text to diarrhea fortnightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.