आरोग्यसेवेत हलगर्जीपणा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:20 IST2018-07-20T00:19:40+5:302018-07-20T00:20:18+5:30
शासकीय रूग्णालयातील अव्यवस्था व रूग्णांचे होत असलेले हाल याबाबत माहिती मिळताच आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचा दौरा केला. याप्रसंगी त्यांनी रूग्णालयातील स्थिती बघता आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे खडसावून सांगितले.

आरोग्यसेवेत हलगर्जीपणा नको
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय रूग्णालयातील अव्यवस्था व रूग्णांचे होत असलेले हाल याबाबत माहिती मिळताच आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचा दौरा केला. याप्रसंगी त्यांनी रूग्णालयातील स्थिती बघता आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे खडसावून सांगितले. तसेच अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकीत्सकासमवेत सर्व अधिकाºयांना चांगलेच फटकारले. रूग्णालयांच्या स्थितीत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
केटीएस जिल्हा रूग्णालयात दौरा केला असता आमदार अग्रवाल यांनी, रूग्णालय परिसरातील घाण व पाण्याच्या निकासीला घेऊन अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रुखमोडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांना फटकारले. पावसळ््यात रूग्णालयात स्वच्छ नसल्यास येथे संक्रमण पसरणार व रूग्णांचा उपचार होण्याऐवजी ते आणखी आजारी पडणार. मोठ-मोठे अधिकारी येथे बसनाताही अव्यवस्था ही गंभीर बाब असल्याचे म्हणत पावसाचे पाणी रूग्णालयात भरत असल्याने डीन व जिल्हा शल्य चिकित्सक यासाठी दोषी असल्याचे सांगितले.
याशिवाय, रूग्ण व वृद्धांच्या सोयीसाठी लावण्यात आलेली व मागील वर्षभरापासून बंद पडलेली लिफ्ट बघूनही आमदार अग्रवाल चांगलेच नाराज झाले. शिवाय वॉर्डात रूग्ण जमिनीवर झोपलेले बघून त्यांनी त्वरीत खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांनी, कधी लिफ्ट, कधी जनरेटर, कधी सिटी स्कॅन तर कधी एक्स-रे व सोनोग्राफी मशीन बंद करून रूग्णांना अडचणीत आणले जाते. शासनाचे कोट्यवधी रूपये यावर खर्च होत असताना संबंधीतांकडून अव्यवस्था करणे गंभीर असल्याचे म्हटले.
याप्रसंगी त्यांच्या सोबत कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, प्रदेश प्रतिनिधी पृ्नथ्वीपालसिंह गुलाटी, शहर महासचिव अपूर्व अग्रवाल, नफीस सिद्धीकी, अजय गौर, व्यंकट पाथरू, बलजीतसिंह बग्गा, शैलेश जायस्वाल, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम यांच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
रूग्ण जमिनीवर दिसता कामा नये
या दौºयात आमदार अग्रवाल यांनी अधिष्ठाता डॉ. रूखमोडे यांच्याकडून रिक्त पदांची माहिती जाणून घेतली. याबाबत लवकरच आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांना रिक्त पदांची सविस्तर यादी देण्याचे निर्देश दिले. मात्र रूग्णालयात एकही रूग्ण जमिनीवर दिसू नये अन्यथा संबंधिताला त्वरीत निलंबित करणार अशा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.