केंद्रप्रमुखांनी केली रवींद्र विद्यालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST2021-01-25T04:29:57+5:302021-01-25T04:29:57+5:30
गेल्या ९ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळा बंद होत्या. मात्र, येत्या २७ तारखेपासून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

केंद्रप्रमुखांनी केली रवींद्र विद्यालयाची पाहणी
गेल्या ९ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळा बंद होत्या. मात्र, येत्या २७ तारखेपासून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले असून, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील शाळांची पाहणी करून अहवाल सादर केल्यानंतर संबंधित शाळांना सुरू करण्यासाठी आदेश दिले जातील. त्यानुसार, चोपा केंद्रप्रमुख शंकर चव्हाण यांनी शनिवारी रवींद्र विद्यालयाची पाहणी केली. यावेळी प्राचार्य सी. बी. पारधी, पर्यवेक्षक के. एस. डोये, ए. जे. मेश्राम, शिक्षक पी. सी. ताराम, सी. एस. कोल्हे, के. टी. मसराम, एस. जी. पटले, माधुरी कटरे, के. एल. तुमसरे, नरेंद्र भड प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या ३ दिवसांपासून शाळेची रंगरंगोटी करून साफसफाई करण्यात आली. मैदानाची सफाई तसेच प्रत्येक वर्गखोली स्वच्छ ठेवण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळूनच वर्ग सुरू करावेत, अशी सूचना शंकर चव्हाण यांनी दिली. यावेळी प्राचार्य सी. बी. पारधी यांनीही शिक्षकांना कोरोनाबाबत मार्गदर्शन करून शाळा सॅनिटाईझ करून सुरू करण्यात येईल व मुलांना सर्व सुविधा पुरवण्याची हमी दिली. तसेच २७ तारखेला विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात यावे, असे पालकांना सांगितले. सोबत पालकांचे परवानगीपत्र पाठवण्याची सूचनाही देण्यात आली.