फेरीवाल्यांसाठी तयार करणार हॉकर्स झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 09:56 PM2019-08-29T21:56:15+5:302019-08-29T21:56:47+5:30

शासनाच्या योजनेतंर्गत फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी उपाय योजनांना सुरूवात केली आहे. यासाठी ४ व ५ सप्टेंबरला ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शासनाने नगर परिषदेला १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हॉकर्स झोनसाठी सर्वेक्षण करण्याचे काम नागपूर येथील एका संस्थेला देण्यात आले आहे.

 Hawkers zone that will make the rounds | फेरीवाल्यांसाठी तयार करणार हॉकर्स झोन

फेरीवाल्यांसाठी तयार करणार हॉकर्स झोन

Next
ठळक मुद्देसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन सर्वेक्षण : स्थायी स्वरुपात मिळणार दुकान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील विविध भागात फिरुन व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना भविष्यात त्यांचे हक्काचे दुकान मिळावे आणि त्यांच्यासाठी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे.यासाठी सप्टेबंर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर फेरीवाल्यांना दुकाने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शासनाच्या योजनेतंर्गत फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी उपाय योजनांना सुरूवात केली आहे. यासाठी ४ व ५ सप्टेंबरला ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शासनाने नगर परिषदेला १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हॉकर्स झोनसाठी सर्वेक्षण करण्याचे काम नागपूर येथील एका संस्थेला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेतंर्गत हॉकर्स झोनसाठी यापूर्वी सुध्दा सर्वेक्षण करण्यात आले आहे.त्यामुळे हे सर्वेक्षण आता अंतीम असल्याचे बोलल्या जाते. या सर्वेक्षणाच्या आधारावर शहरातील फेरीवाल्यांची एक यादी तयार केली जाणार आहे.या यादीमध्ये ज्या फेरीवाल्यांचा समावेश असेल त्यांना हॉकर्स झोनमध्ये दुकाने उपलब्ध करुन दिले जाणार आहे.हे काम युध्द पातळीवर करण्यासाठी एका अस्थायी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये शहरातील विविध भागात कार्यरत नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीची सभा सुध्दा चार पाच दिवसांनी होणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हे काम विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणानंतर त्यांच्या हितासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी सर्वेक्षण यादीतील फेरीवाल्यांना मतदानाचा अधिकार सुध्दा मिळणार आहे. ही समिती हॉकर्स झोनसाठी जागेची निवड करेल तसेच किती झोन तयार करायचे याचा निर्णय सुध्दा घेईल.
विशेष म्हणजे यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाणार असून किती निधीची गरज आहे याच्या मागणीचा प्रस्ताव सुध्दा तयार करुन पाठविण्याची जवाबदारी ही या कमिटीची असणार आहे.
नगर परिषदेसमोरील जागेत हॉकर्स झोन
शहरात नगर परिषदेसमोर चार एकर जागा उपलब्ध आहे. याठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना हटवून संकुल तयार करण्याचे प्रस्तावित आहे. चार मजली संकुलात व्यापाऱ्यांना दुकानांसाठी जागा दिली जाणार असून व्यापाऱ्यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर हॉकर्स झोन तयार करण्यात येणार आहे.
फेरीवाल्यांना दुकानांचा उपयोग होणार का?
शासनाने शहरातील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करुन त्यांना दुकाने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फेरीवाल्यांना काही रक्कम जमा करावी लागणार आहे. मात्र ही रक्कम ते आणणार कुठून हा सुध्दा प्रश्नच आहे. फेरीवाले हे शहरातील गल्ली बोळात जाऊन सामानांची विक्री करतात. मात्र त्यांनी एकाच ठिकाणी दुकान लावल्यानंतर तिथे ग्राहक येणार का हा सुध्दा प्रश्न आहे.त्यामुळे बहुतेक फेरीवाल्यांना दुकांनाचा आपल्याला फारसा उपयोग होणार नसल्याचे सांगितले.

शासनाचा फेरीवाल्यांना स्थायी स्वरुपात दुकाने उपलब्ध करुन देऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा हेतू आहे. यासाठी फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार करण्याच्या दिशेने काम सुरू करण्यात आले असून याची त्यांना निश्चितच मदत होईल.
- धनराज बनकर, व्यवस्थापक दीनदयाल उपाध्याय नागरी अभियान न.प.गोंदिया.

Web Title:  Hawkers zone that will make the rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.